Pune Crime News | पुणे: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कामानिमित्त उत्तरप्रदेश येथून कुटुंबासह पुण्यात राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील पतीने कौटुंबिक वादातून पत्नीचा खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बाप ज्यावेळी आईला मारत होता त्यावेळी त्यांची तीन लहान मुले समोर होती. हा प्रकार (Pune Crime News) पुणे शहरातील भवानी पेठेत (Bhawani Peth) घडला आहे. आरोपी पतीला समर्थ पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे.

नूरजहाँ मोहम्मद शफीक चौधरी (वय-28 सध्या रा. अनंत कोऑपरेटिव्ह सोसायटी, मंजुळा चाळ, भवानी पेठ, पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश-Uttar Pradesh) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती मोहम्मद शफीक सुकीरल्ला चौधरी (वय-34) याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी चार वर्षांपूर्वी कामानिमित्त उत्तरप्रदेशातून कुटुंबाला घेऊन पुणे शहरात
आला होता. भवानी पेठेतील मंजुळा चाळ याठिकाणी हे कुटुंब वास्तव्यास होते. आरोपी चौधरीचा टेलरिंगचा व्यवसाय होता.
नुरजहाँ आणि मोहम्मद यांना पाच, अडीच आणि एक वर्ष अशी तीन मुले आहेत.
लग्न झाल्यानंतर या दोघांमध्ये घरगुती कारणांवरुन सतत वाद (Family Dispute) होत होते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद हा नुरजहाँच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घाल होता.
याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपी मोहम्मद याने पत्नी नुरजहाँ हिचा गळादाबून खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग