अ‍ॅक्ट्रेस श्वेता तिवारीवर सॅलरी न देणं आणि फसवणुकीचा आरोप ! मिळाली लीगल नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही स्टार श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आपला फिटनेस आणि फोटो, तसेच व्हिडिओमुळं कायमच चर्चेत असते. चाहते तिच्या फिनेटसबद्दल विचारत असतात आणि तिचं कौतुक करत असतात. अनेकदा श्वेता तिच्या पर्सनल लाईफमुळंच चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वची तिचा पती अभिनव कोहली (Shweta Tiwari) यानं तिला मानहानीची लीगल नोटीस पाठवली होती. यानंतर आता तिच्या अ‍ॅक्टिंग स्कूलच्या एक्स कर्मचाऱ्यानं तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे आणि तिला लीगल नोटीस पाठवली आहे.

श्वेतावर फसवणुकीचा आरोप
श्वेतानं मुंबईत अ‍ॅक्टिंग स्कूल सुरू केलं होतं. यात नाव होतं श्वेत तिवारीद क्रिएटिव्ह स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग (Shweta Tiwari’s Creative School Of Acting). या स्कूलमध्ये राजेश पांडे (Rajesh Pandey) हे अ‍ॅक्टिंगची टीचर होते. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राजेश पांडे म्हणाले, मी श्वेता तिवारीच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये 2012 पासून अ‍ॅक्टिंग शिकवण्याचं काम करत होतो. परंतु तिनं माझी डिसेंबर 2018 ची सॅलरी दिली नाही. याशिवाय माझ्या टीडीएस (TDS) चे पैसेही कधी जमा केले नाहीत. श्वेता तिवारीच्या स्कूलमध्ये तिने अनेक वर्षे काम केलं. आणि त्या बदल्यात मला काय मिळालं, धोका.

राजेश पांडे पुढं बोलताना म्हणाले, मी खूप वैतागलो आहे. कारण माझे पैसे देणं तर दूरच श्वेतानं माझा फोन घेणंही बंद केलं आहे. कोरोनामुळं माझ्याकडे अजिबात पैसे नाही राहिले. माझा घरमालकही मला भाड्यासाठी त्रास देत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अभिनव कोहलीनंही केली टीका
वृत्तवाहिनीनं सत्य जाणून घेण्यासाठी श्वेताला संपर्क साधला असता, तिनं फोनला उत्तर दिलं नाही. परंतु तिचा पती अभिनव कोहली यानं यावर भाष्य केलं आहे. अभिनवनं सांगितलं की, हे खरं आहे की, श्वेता तिवारीनं राजेश पांडेचे 50 हजार रुपये दिलेले नाहीत. मी त्याला पर्सनली ओळखतो. मला त्याचं वाईट वाटत आहे. दोन वर्षांपासून बिचारा राजेश पैशांसाठी हातापाया पडत आहे. परंतु श्वेता मात्र त्याला त्याचेच पैसे देण्यासाठी तयार नाही. उलट ती म्हणते की, माझ्या फेममुळं तो माझ्या मागे लागला आहे. राजेश पांडेकडे सर्व पुरावे आहेत की, तिनं त्याचे पैसे दिलेले नाहीत.

श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती हम तुम और देम या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिनं लिपलॉक किसिंग सीनसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते. याशिवाय सध्या ती मेरे डॅड की दुल्हन या मालिकेत काम करत आहे.

You might also like