Siddhant Chaturvedi | अमिताभ बच्चन यांच्या नातीला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर सिद्धांत चतुर्वेदीने सोडलं मौन, म्हणाला….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) ‘गली बॉय’ (Gully Boy) या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून त्याला अनेक ऑफर्स मिळाल्या. काही महिन्यांपूर्वीच त्याने दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) ‘गहराईयाँ’ (Gehraiyaan) या चित्रपटात भूमिका साकारली होती. यानंतर आता तो इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) ‘फोन भूत’ (phone Bhoot) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबरोबर तो खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. खासगी आयुष्यात सिद्धांतचं (Siddhant Chaturvedi) नाव अमिताभ बच्चन (Big B) यांची नात नव्या नवेलीसोबत (Navya Naveli) जोडलं गेलं आहे.

 

मागच्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि नव्याच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) आपले मौन सोडले आहे. ‘फोन भूत’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांतला त्याच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला कि “मी कोणाला तरी डेट करतोय, ही बाब खरी असावी अशी माझीसुद्धा इच्छा आहे.” सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे सिद्धांत आणि नव्या डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नव्या ही श्वेता बच्चन नंदाची (Shweta Bachchan Nanda) मुलगी आणि बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Bollywood actor Amitabh Bachchan) यांची नात आहे.
नव्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या.
मात्र तिने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा कोणताच विचार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
याऐवजी ती वडील निखिल नंदा (Nikhil Nanda) यांचा व्यवसाय सांभाळणार असल्याचे तिने म्हंटल आहे.

 

Web Title :- Siddhant Chaturvedi | siddhant chaturvedi reacts to navya naveli nanda dating rumours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक