Weather Forecast IMD Alert | देशात आठवडाभर पावसाचा जोर कायम; महाराष्ट्रातही 5 दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून ‘अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Weather Forecast IMD Alert | भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस (Heavy Rain) होणार आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. उत्तर ओडिसा (North Odisha), पश्चिम बंगाल (West Bengal) आणि झारखंड (Jharkhand) दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस (Weather Forecast IMD Alert) कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. 17 जुलैपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह भारताच्या पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता असून आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने (Weather Forecast IMD Alert) सांगितले आहे.

महाराष्ट्रात 5 दिवस जोरदार पाऊस

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्राच्या (Madhya Maharashtra) काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भाच्या काही (Vidarbha) भागातही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Life Disrupted) झाले.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) गंगाही धोक्याच्या पातळीवर आली आहे.
पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
हरियाणा-चंदीगडमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. डोंगराळ भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे.
पावसाचा कहर हिमाचल प्रदेशात कायम आहे.

Web Title :   Weather Forecast IMD Alert | weather update today imd alert himachal pradesh uttarakhand haryana punjab west bengal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Mangala Narlikar Passed Away | डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितीतज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

Pune Gold Rate Today | आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

Today Horoscope | 17 July Rashifal : मेष आणि वृषभसह या 5 राशीवाल्यांना मिळेल भाग्याची साथ, वाचा दैनिक राशिफळ