Threat Call To Gadkari | नितीन गडकरींना धमकी देणारा अफसर पाशाला 5 दिवसाची पोलीस कोठडी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Threat Call To Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी प्रकरणात कर्नाटकातील बेळगाव कारागृहात (Belgaum Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगणारा दहशतवादी अफसर पाशा (Afsar Pasha) याला पाच दिवस (19 जुलैपर्यंत) पोलीस कोठडीत (Nagpur Police Custody) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने (Nagpur Court) दिले आहे. (Threat Call To Gadkari)

अफसर पाशा हा धंतोली पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाही. तो कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. सतत चुकीची माहिती देऊन पोलिसांना फसवत आहे. पाशाला धंतोली पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाशाला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, धंतोली पोलीस ठाण्यात (Dhantoli Police Station) जयेश पुजारीसह (Jayesh Pujari) अफसर पाशावर दोन गुन्हे (FIR) दाखल आहेत. त्या प्रकरणातसुद्धा पाशाची चौकशी करण्यात येणार आहे. (Threat Call To Gadkari)

नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अफसर पाशा याला बेळगाव कारागृहातून ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणले. अफसर पाशा धंतोलीच्या कोठडीत बंद असून त्याची जयेश पुजारीच्या समोर चौकशी करण्यात येईल. अफसर पाशा हा विवाहित असून त्याचे कुटुंब जम्मू काश्मिरमध्ये (Jammu And Kashmir) वास्तव्यास आहे. परंतु. 2006 पासून हा बेळगाव कारागृहात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, मंत्री नितीन गडकरी यांना पैसे आणि बॉम्बस्फोट करण्याची धमकी पाशानेच जयेश पुजारीला देण्यास भाग पाडले होते.
पुढील आठवड्यात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोन्ही दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएच्या (NIA)
ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title :   Threat Call To Gadkari | terrorist afsar pasha remanded for five days nagpur police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr. Mangala Narlikar Passed Away | डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणितीतज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

Pune Gold Rate Today | आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

Today Horoscope | 17 July Rashifal : मेष आणि वृषभसह या 5 राशीवाल्यांना मिळेल भाग्याची साथ, वाचा दैनिक राशिफळ