सेल्फी घेण्याचा वेडेपणा ‘खराब’ करू शकतो तुमची ‘स्कीन’, जाणून घ्या साइड इफेक्ट्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजचे युग मोबाइल आणि नवीन तंत्रज्ञानाचे आहे. खासकरुन लोक सेल्फी घेण्यास कमालीचे वेडे असतात. चांगली जागा भेटली की सेल्फी घेण्यास सुरुवात करतात. ही प्रत्येकाची सवय आहे. जर कोणी एक-दोन दिवस सेल्फी घेतला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होते, म्हणून कोणाला बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तर ते घरी तरी सेल्फी काढतात. सेल्फीजच्या वेड्या लोकांना फोटो तर आवडतील पण माहिती आहे का? की सेल्फी घेण्याचे बरेच नुकसान आहेत. तुम्हाला सेल्फी घेण्यास आवडत असेल पण या सेल्फीमुळे याचा तुमच्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या

१) सेल्फी अकाली वृद्धत्व आणू शकते
सेल्फी घेण्याचा पहिला दुष्परिणाम हा आहे की यामुळे आपली त्वचा जलद वाढते. इतकेच नाही तर तुम्ही वेळे आधीच म्हातारे दिसू लागता. तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेज नाहीसे होते.

२) घातक किरणे त्वचेला खराब करतात
जेव्हा आपण बाहेर जाता तेव्हा आपण आपल्या चेहर्‍यावर सनस्क्रीन लावता, परंतु सनस्क्रीन मोबाईलमधून निघणार्‍या इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन किरणांना प्रतिबंध करू शकत नाही. त्यामुळे आपली त्वचा खराब होऊ लागते.

३) त्वचेत असलेल्या डीएनएवर होणारा परिणाम
इतकेच नाही तर मोबाईलमधून निघणारे रेडिएशन इतके धोकादायक आहे की त्याचा परिणाम आपल्या त्वचेमध्ये असलेल्या डीएनएवर होतो. यामुळे त्वचेच्या दुरुस्ती क्षमतेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि कोणत्याही क्रीम किंवा कोणत्याही सनस्क्रीनद्वारे या समस्येचे निराकरण होत नाही.

४) चेहऱ्याचा रंग बिघडते सेल्फी
आजकाल लोक सेल्फीसाठी इतके वेडे आहेत की ते ५०-६० सेल्फी घेतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवर कुठेतरी परिणाम होतो आणि त्वचेचा रंग बिघडन्यास सुरुवात होते.