Side Effects Of Turmeric Milk | या ५ लोकाना त्रासदायक ठरते Curcumin, चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध

नवी दिल्ली : Side Effects Of Turmeric Milk | हळदीचे दूध अनेकांना आवडते. सर्दी, कमजोर इम्युनिटी आणि इतर आरोग्य समस्यांवर ते लाभदायक आहे (Turmeric Milk Benefits). हळदीमध्ये कर्क्यूमिन (Curcumin) नावाचे कंपाउंड असते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, जे अनेक रोग आणि समस्या टाळते. तर दूध प्रोटीन आणि कॅल्शियमचा (Milk Benefits) चांगला स्रोत आहे. आयुर्वेदात हळदीला आयुर्वेदिक औषधाचा (Ayurvedic Medicine) दर्जा आहे. मात्र, हळद सर्वांसाठी सुरक्षित नाही. हळदीचे सेवन करणे काहींना त्रासदायक ठरू शकते (Turmeric Milk Side Effects).

आयर्नची कमतरता (Iron Deficiency)
हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरात आयर्नची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण हळदीमधील एक कंपाउंड (कर्क्यूमिन) शरीराला आयर्न शोषण्यास अडथळा आणते. आयर्नची कमतरता असेल तर हळदीचे सेवन कमी करा किंवा पूर्णपणे टाळा.

लिव्हरची समस्या (Liver Problem)
हळदीमधील कर्क्यूमिन उष्ण असल्याने शरीराच्या पीएचवर परिणाम होतो. लिव्हरमध्ये सूज येते. लिव्हरची समस्या असलेल्यांनी हळदीचे दूध पिणे टाळावे.

पोटाच्या समस्या (Gastrointestinal Problems)
ज्यांना पोटाचा त्रास आहे, त्यांनी हळदीचे दूध पिणे टाळावे. हळदीमधील कर्क्यूमिन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी कंपाउंड आहे. हळदीच्या दुधामुळे पोटात जळजळ आणि इतर पचन समस्या होऊ शकतात. पोटाची समस्या असेल तर हळदीचे दूध टाळा.

ज्यांना ऍलर्जी आहे (Allergy of Turmeric)
काही लोकांना हळदीची ऍलर्जी असू शकते. हळदीची ऍलर्जी असेल तर हळदीचे दूध पिणे टाळा. (Side Effects Of Turmeric Milk)

गरोदर किंवा स्तनपान देणारी माता
गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. अन्यथा गर्भाशयात पेटके, रक्तस्त्राव आणि वेदना होऊ
शकतात. हळदीच्या सुरक्षित वापराबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाही, म्हणूनच अशा महिलांनी हळदीचे दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या लोकांनी हळदीच्या दुधाचे जास्त सेवन करणे टाळावे. हळदीचे दूध सेवन करताना योग्य प्रमाण आणि कालावधीची
काळजी घ्यावी. हळदीचे दूध प्यायल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | संदीप कदम यांची घनकचरा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती; प्रसाद काटकर यांनी झोन चारच्या उपायुक्तपदाचा कारभार घेतला हाती