मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एखादी पार्टी किंवा काही घरगुती कार्यक्रमाला जाताना महिला मेकअप करतात, परंतू उशीर झाल्यास आणि काही कारणाने राहून गेल्यास मेकअप रिमूव्ह करण्याचा राहून जातो. त्यामुळे त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेकअप रिमूव्ह करुन मगच झोपण्याचा सल्ला अनेकांकडून कडून दिला जातो. कारण मेकअप करुन झोपणे महागात पडू शकते.

दिवसभरात आपल्या त्वचेचे सेल्स प्रदूषण आणि घातक ठरणाऱ्या यूव्ही किरणांशी लढत असते, पण रात्री त्वचा ‘रिपेअर मोड’मध्ये असते, अशावेळी जर झोपण्याआधी मेकप काढणे राहून गेले तर मात्र ते त्वचेसाठी घातक ठरु शकते.

मेकअपने होते स्किनमधील माईश्चर कमी –
हेल्दी स्किन ठेवण्यासाठी स्किन पोर्स ओपन राहणे आवश्यक असते. पोर्समध्ये जर धूळ माती जमा होत असेल तर स्क्रब स्वच्छ करणं आवश्यक असते.
जर रात्रभर मेकअप तसाच राहिला तर मात्र स्किन पोर्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. तसेच मेक अप आपल्या स्किनमधील माईश्चर कमी करतात आणि त्यांने स्किन ड्राय होऊ शकते.

धूळ साचून होऊ शकते स्कीनला नुकसान –
जर मेकअप खटवला तर स्कीन रिफ्रेश होऊन स्कीनला ताजी हवा मिळते आणि स्कीन तजेलदार दिसते. संपुर्ण दिवसभर आपण प्रदुषणात वावरत असतो त्यामुळे चेहऱ्यावर धुळ साचते आणि जर तुम्हा तासाच मेकअप ठेवून झोपलात तर स्कीनला नुकसान पोहचू शकते आणि स्कीन लवकरच खराब दिसू शकते.

फेसबुक पेज लाईक करा –