Dapodi : पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम

दापोडी : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल दरवाढ कमी करण्याबाबत आणि गॅसची सबसिडी देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने दापोडीमध्ये स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात दापोडी येथील गणेश नगर येथून करण्यात आली. यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी आणि गॅसची सबसिडी मिळावी अशी मागणी पंतप्रधान यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीच्या पत्रावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दापोडीमध्ये करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे मनसेचे उप विभाग प्रमुख अलेक्सझांडर मोझेस यांनी सांगितले.

यावेळी सतीश मथमर्थी, सागर भेगडे, सागर भोकरे, शुभम सटतालु, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, विक्रम शेळके, प्रशांत सांगळे, अनिल काची, अनिल कुलकर्णी आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.