SII | दिलासादायक ! कोरोना संकटात लहान मुलांची चिंता नको; ‘सीरम’नं दिली आनंदाची बातमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) लहान मुलांकरिता अधिक धोकादायक असल्याचा इशारा दिला जात असतानाच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) एक दिलासादायक बातमी दिली आहे. कोवोव्हॅक्स (Covovax) लशीची लवकरच लहान मुलांवर चाचणी केली जाणार असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे. त्यासाठी कंपनी लवकरच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) या नियामक संस्थेकडे परवानगीसाठी अर्ज करणार आहे. सिरमकडून उत्पादित केली जाणारी ही दुसरी कोरोनाप्रतिबंधक लस (Vaccine) आहे. एका वृत्तानुसार, सुरुवातीला 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी घेतली जाईल. त्यानंत रच्या टप्प्यामध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात येणार आहे.

नोव्हाव्हॅक्स कंपनी (Novavax Company) सिरम इन्स्टिट्यूटसह लस उत्पादन करणार असल्याचे सप्टेंबर 2020 मध्ये जाहीर केले होते. या दोन्ही कंपन्या मिळून ही लस विकसित केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला (Serum Institute CEO Adar Poonawalla) यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आम्ही एक नवा टप्पा गाठला आहे. या आठवड्यात आम्ही कोवोव्हॅक्स लशीची पहिली बॅच तयार करणे सुरु केले आहे. पुण्यातल्या आमच्या कंपनीत तयार होणाऱ्या कोवोव्हॅक्स लशीची पहिली बॅच पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या लशीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या भावी पिढ्यांचे संरक्षण करण्याची क्षमता असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. कोवोव्हॅक्स लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अमेरिका अन् मेक्सिकोमधल्या 119 ठिकाणी केल्या गेल्या. यात 29 हजार 960 जण सहभागी झाले होते. या चाचणीनंतर आलेल्या निष्कर्षानुसार ही लस 90.4 टक्के प्रभावी आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- SII | dont worry about the childrens in corona third wave good news given by pune’s serum institute of india

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)