Gold-Silver Rate Today : सोन्याच्या भावात घसरण, चांदी देखील 1126 रुपयांनी उतरली ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळं परदेशी बाजारात सोन्याची किंमत (Gold Rate) सातत्यानं उतरत आहे. याचाच परिणाम अज देशांतर्गत बाजारावर देखील दिसून आला. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 268 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver Rate) 1126 रुपयांची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर (Diwali) पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढू शकतात. डिसेंबर अखेर पर्यंत सोन्याचे दर सर्वाधिक स्तरावर पोहोचू शकतात. सोन्यात दर 500 ते 600 रुपयांच्या घसरणीनंतर गुंतवणूक केली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर सोन्याचे दर 52500 ते 53000 होऊ शकतात.

सोन्याचे आजचे जर (Gold Rate on 20th October 2020)
HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत मंगळवारी 268 रुपये प्रति तोळा कमी झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 50,860 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर सोमवारी सोन्याच्या किंमतीचे ट्रेडिंग 51,128 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

चांदीचे आजचे दर (Silver Rate on 20th October 2020)
मंगळवारी चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. चांदी 1126 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,189 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर 63,315 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होते.

नोव्हेंबरमध्ये (November) पुन्हा एकदा मिळेल स्वस्त सोने खरेदीची संधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India-RBI) सॉव्हरेन गोल्डची ( (Sovereign Gold)विक्री करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार चालू आर्थिक वर्षात उर्वरीत 5 महिन्यात 5 वेळा गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही संधी 12 तारखेला मिळाली होती.

आता पुढची संधी ही नोव्हेंबर मध्ये मिळणार आहे. 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान 8 व्या सीरिज अंतर्गत गोल्ड बाँड जारी केले जाणार आहेत. या दरम्यान गुंतवणूक करणाऱ्यांना 18 नोव्हेंबर रोजी बाँड सुपूर्त केले जातील. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.