#Viral : बिग बॉस मधील साध्या राहणाऱ्या उर्वशीने केले ट्रान्सफॉर्मेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 12 ची कंटेस्टंट उर्वशी वाणी सध्या चर्चेत आली आहे. याला कारणही खास आहे ते म्हणजे तिने केलेलं ट्रान्सफॉर्मेशन. तिने केलेल्या मेकओवरचे फोटो सध्या सोशलवर गाजताना दिसत आहे. तुम्ही जर उर्वशीचे फोटो पाहिलेत तर लक्षात येईल की, तिचे हे फोटो हैरान करणारे आहेत असे तुम्हीही म्हणाल. सध्या उर्वशीचे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सिंपल लुकमध्ये राहणाऱ्या आणि बिना मेकअप दिसणाऱ्या उर्वशीचे काही हटके फोटो समोर आले आहेत. ती या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. बिग बॉसनंतर ती सोशल मीडियावर उर्वशी नेहमीच सक्रिय असते.

फोटोंमध्ये दिसत आहे की, उर्वशीने वन साईडेड ऑफ शोल्डर टॉपआणि ब्लॅक कलरचा फ्रिल स्कर्ट परिधान केला आहे. मेसी हेअर बन, मिनिमल मेकअप आणि डार्क लिपस्टिक मध्ये उर्वशी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. उर्वशी यात खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिच्या सुंदर रुपाचे चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.

बिग बॉस 12 मध्ये उर्वशी आणि दीपक ठाकुर यांची जोडी दिसून आली होती. तिने तिच्या साधेपणाने घरच्यांचे आणि चाहत्यांचे मन जिंकले होते. तिच्या चाहत्यांकडूनही तिला भरभरून प्रेम मिळाले. बिग बॉस नंतर तिच्या फॅनफॉलोविंगमध्येही कमालीची वाढ झाली. उर्वशीला इंस्टाग्रामवर 80 हजाराहून अधिक लोक फॉलो करतात.

https://www.instagram.com/p/Bwq0FLnBC4p/

https://www.instagram.com/p/BwLyV00BzCU/