Singer Neha Kakkar | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर घेणार का घटस्फोट? सोशल मीडियावर पोस्ट करत दिले उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Singer Neha Kakkar) ही अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण म्हणजे अनेक दिवसांपासून नेहा तिचा पती रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे एकत्र दिसले नसून, नाही त्यांनी कोणते फोटो पोस्ट केले आहेत. एवढेच काय तर नेहा कक्करने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला मात्र या सेलिब्रेशनमध्येही रोनहप्रित दिसून आला नाही. त्यामुळे नेहा कक्कर (Singer Neha Kakkar) आणि तिचा पती रोहनप्रितमध्ये सारे काही आलबेल चालू नसल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर उधाण आणले होते. आता मात्र यावर स्वत: नेहाने उत्तर दिले आहे.

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही तिच्या गाण्यांमुळे आणि स्टाईलमुळे अनेकांना आवडते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. नेहाने 2020 साली पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्नबंधनात अडकली. नेहाच्या लग्नाचीही खूप चर्चा रंगली होती. (Neha Kakkar And Rohanpreet) नेहाच्या लग्नाच्या चर्चा रंगण्यामागे एक कारण होते तिची स्टाईल आणि तिच्या पतीमध्ये व तिच्यामधील वयाचा फरक. नेहाचा पती हा तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असल्यानेही तिची खूप चर्चा झाली होती. आता मात्र ते एकत्र दिसत नसल्याने त्यांच्या घटकस्पोटाच्या चर्चा रंगू लागल्या.

मात्र आता नेहाने अफवा पसरवणाऱ्यांची तोंडे बंद केली आहेत. नेहाने तिच्या सोशल मीडियावर पती रोहनप्रीतसोबतचे फोटो शेअर केले आहेत , ज्यात ती रोहनप्रीतच्या गालावर किस करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने तिच्या अप्रतिम प्रवासाबद्दल सांगितले जिथे ती अलीकडे गेली होती. या फोटोत नेहाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि रोहनप्रीत पांढरा शर्ट आणि पांढरा पगडी घातलेला दिसत आहे. तिने हे पोस्ट शेअर करताच सोशल मिडियावर हे फोटो व्हायरल झाले आहे. नेटकरी दोघांचे अभिनंदन करत आहे. तर चाहते तिने याबद्दल स्पष्टच सांगितलं म्हणुन तिच कौतुकही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही पोस्ट केलेत देवाचे आभार की तू हे पोस्ट केलेस लोकांना वाटत होते की तुम्ही घटस्फोट (Neha Kakkar Divorce) घेतला आहे’, तर काहींनी रोहनलाच प्रश्न विचारले आहेत. की तो इतके दिवस कुठे होता.

यावर नेहावर (Singer Neha Kakkar) चाहत्यांचे किती प्रेम आहे हे दिसून येते. नेहाची अनेक गाणी जबरदस्त
हिट झाली आहे. यामध्ये काला चष्मा (Kaala Chashma), साकी साकी (Saki Saki), गरमी (Garami),
मै तेरा बॉयफ्रेंड (Mai Tera Boyfriend) ही गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतात.
नेहा एका संगीत रिअलिटी शो चे परिक्षक म्हणूनही काम पाहते.

Web Title :  Singer Neha Kakkar | neha kakkar shuts divorce rumours with hubby rohanpreet singh share posts viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

Pune Crime News | आरटीओचा भोंगळ कारभार, आयो जायो घर तुम्हारा ! आरटीओमध्ये परस्पर 9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाच्या सरी; उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम

Biporjoy Cyclone Updates | गुजरातनंतर आता ‘बिपरजॉय’ राजस्थानला धडकणार; अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचे दर काय? जाणून घ्या