दीपिकाचा ‘तो’ फोटो शेअर करत रणवीर सिंगनं केलं ‘स्पेशल’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा एनर्जेटीक अॅक्टर रणवीर सिंगने नुकताच आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दीपिकानेही त्याला खास अंदाजात विष केले. दीपिका आणि रणवीर सध्या युकेमध्ये आहेत. आपला आगामी सिनेमा ८३ च्या शुटींगमध्ये सध्या ते व्यस्त आहेत. रणवीरने सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा फोटो शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या फोटोत दिसत आहे की, दीपिका रिलॅक्स करत बसली आहे सुंदर नजारे पहात आनंद घेत आहे. रणवीरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “हाई ऑन केक.” हॅशटॅग देत लिहिलं आहे की, “हॅप्पी बर्थडे फॉर मी.” दोघेही कलाकार पर्सनल आणि प्रोफेशनलवर शानदार बाँडिंग शेअर करताना दिसतात.


दीपिकाच्या रणवीरला हटके वाढदिवसाच्या शुभेच्छा
याआधी रणवीरच्या वाढदिवशी दीपिकाने रणवीरचा लहानपणीचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “संवेदनशील, भावूक, केअरींग, दयाळू, सभ्य, समजदार, उदार, विश्वसनीय, रोचक, रमणीय आणि त्यापेक्षाही खूप काही. माझा हँडसम, माझा मित्र, माझा प्रेमी सोबतच माझा चाईल्ड, बच्चा, माझा सनशाईन आणि माझा इंद्रधनुष्य. माझी अशी इच्छा आहे की, तू असाच नेहमी पुढे जात राहो. आय लव्ह यू.”

https://www.instagram.com/p/Bzldd83AYft/?utm_source=ig_embed

आगामी सिनेमा ८३ विषयी…
८३ या सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, याचे दिग्दर्शन कबीर सिंह करत आहेत. 1983 साली भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला होता. त्याची ही गोष्ट आहे. रणवीर या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत आहे तर दीपिका त्यांच्या पत्नीचा रोल करत आहे. वाढदिवसाचे निमित्त साधत रणवीरने या सिनेमातील आपला फर्स्ट लुक शेअर केला होता. कपिल देवच्या भूमिकेतील रणवीर सिंग चाहत्यांना भावला आहे.

या सिनेमात दीपिका आणि रणवीरने केले एकत्र काम
दीपिका आणि रणवीरने याआधी गोलियों की रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. आता ८३ या सिनेमात दोघेही पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 2018 मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. ८३ सिनेमातही दोघांनीही पती पत्नीचाच रोल साकारला आहे.

 

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी