‘या’ 6 अवयवांना काढून टाकले, तरीसुद्धा सहज काम करू शकते आपले शरीर

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या शरीरात असे अनेक अवयव असे आहेत, जे अतिरिक्त आहेत. म्हणजे जे काढले तरीसुद्धा आपले शरीर सहज काम करू शकते. अपेंडिक्सबाबत तुम्ही ऐकले असेल, परंतु इतरही अनेक अवयव आहेत जे अनावश्यक आहेत. होय, पण आपल्या पूर्वजांसाठी ते खुप उपयोगी असावेत. विशेष करून शिकार करणे किंवा दूरवरूनच कुणाची चाहूल घेणे, किंवा वास घेण्यासाठी हे अवयव उपयोगी येत असावेत. शास्त्रज्ञांनुसार शरीराच्या क्रमबद्ध विकासासोबत अनेक अवयव गायब झाले असावेत, परंतु अजूनही आपल्या शरीरात असे अनेक अवयव आहेत, जे अनावश्यक आहेत.

1 अपेंडिक्स
छोट्या आणि मोठ्या आतड्यांच्या मध्यभागी असलेला हा अवयव कोणत्याही कामाचा नाही. उलट अनेकदा यामध्ये सूज आल्याने पोटात संसर्ग होण्याची भिती असते. म्हणून घाईगडबडत ऑपरेशन करून ते काढावे लागते. एवढेच नव्हे, तर वेळेवर उपचार मिळाला नाही तर रूग्णाच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण होतो. सध्या अनेक शास्त्रज्ञ मानतात की, अपेंडिक्स इतकाही अनावश्यक अवयव नाही, उलट यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. मात्र, यास दुजोरा मिळालेला नाही.

2 टॉन्सिल
हा अवयवसुद्धा अनावश्यक मानला जातो. तोंडात अक्कल दाढेच्या टोकाला आढळणारा हा अवयव केवळ मांसाचा एक तुकडा आहे, ज्याचे बोलणे, ऐकणे, किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये योगदान नाही. अनेकदा यामुळे तोंडात संसर्ग होतो, ज्यामुळे गळ्यात वेदना होतात आणि रूग्ण खाऊ-पिऊ शकत नाही. अनेकदा टॉन्सिल सतत वाढल्याने डॉक्टर सर्जरी करून हा अवयव काढून टाकतात.

3 अक्कल दाढ
अक्कल दाढ म्हणजे विसडम टीथसुद्धा याच श्रेणीत येते. पूर्वजांच्या काळात कच्चे मांस चावणे किंवा पचवण्यात ती उपयोगी असू शकते, परंतु आता ती एक अनावश्यक भाग आहे. अनेक लोकांचा दाढेचा हा भाग कधी येतच नाही. अनेकदा जबड्यात योग्य जागा नसल्याने अक्कल दाढ येताना खुप त्रास होतो. ही दाढ मुळापासून काढावी लागते.

4 पॅरानेजल सायनस
हे सुद्धा अविशेष अवयवांमध्ये येते. हे नाकाच्या चारी बाजूला असते आणि याचे कोणतेही काम नाही. उलट थंडीमध्ये याच्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. मात्र, आजकाल शास्त्रज्ञ मानतात की, त्याचे काम अस्पष्ट असले तरी जरूरी आहे. हे चेहर्‍याच्या मांसपेशी संतुलित ठेवते. काही असले तरी सध्या ते अनावश्यक मानले जाते.

5 टेलबोन
टेलबोन सुद्धा एक अनावश्यक अवयव मानला जातो. ते आपल्या उपयोगाचे नाही. पाठीच्या कण्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असते. असे मानले जाते की मनुष्याच्या पूर्ण विकसित शरीरात ते पूर्णपणे शेपटीप्रमाणे असेल, जे चालताना किंवा पळताना नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडत असेल. सध्या हा भाग आपल्या कोणत्याही कामाचा नाही.

6 ऑरिक्यूलर मांसपेशी
ऑरिक्यूलर मांसपेशी सुद्धा आपल्या उपयोगाच्या नाहीत. त्या आपल्या कोपरांच्या चारही बाजूला असतात. या मसल्स जनावरांमध्ये सुद्धा आढळतात. ते याच्या मदतीने कान हलवून दूरचा आवाज घेऊ शकतात. सोबतच हे त्यांच्यासाठी विविध संवेदना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. मात्र, माणसात या मांसपेशी कोणतेही काम करत नाहीत.