Air India चा प्रत्येक 6 वा कर्मचारी ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू; मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एअर इंडियाच्या 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत लेखी स्वरूपात याबाबतची माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत एअर इंडियाच्या एकूण 1995 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यात वंदे भारत या मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांपैकी एकूण 583 जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारीपर्यंत एअर इंडियाकडे 12, 350 कर्मचारी होते. त्यापैकी 8, 290 स्थायी कर्मचारी तर 4, 060 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी आणि एअर इंडियाच्या आरोग्य विभागाद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे काम करण्याची आवश्यकता आहे. भारतात चौथ्यांदा फेब्रुवारीत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी 9121 इतकी होती. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1, 09, 25, 710 झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा कोरोनाच्या संक्रमणामुळे एका दिवसात 100 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात विषाणूमुळे आणखी 81 लोकांचा मृत्यू झाल्याने आता एकूण मृतांची संख्या वाढून 1, 55, 813 झाली आहे. आतापर्यंत देशात 1, 06, 33, 025 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचा दरही 97. 32 टक्क्यांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.43 टक्के आहे. देशात सध्या दीड लाखांपेक्षाही कमी रुग्णावर उपचार सुरू आहेत.