Skin Care In Summer | उन्हात चेहरा होऊ शकतो निर्जीव, घरात तयार करा ‘हे’ 3 फेस पॅक

पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात त्वचेची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. कारण, उष्ण हवा आणि सूर्यप्रकाशामुळे चेहर्‍याची त्वचा होरपळते आणि ती निर्जीव बनते (Skin Care In Summer). त्यामुळे तुम्ही तरुण वयातच म्हातारे दिसू लागतात. उन्हाळ्यात महिलांनी घरगुती फेसपॅक वापरणे आवश्यक आहे (Skin Care In Summer). त्यामुळे त्वचा पूर्वीपेक्षा अधिक तरुण दिसू लागते. उन्हाळ्यात कोणता फेस पॅक वापरावा ते जाणून घेऊया (Homemade Face Pack for Summer).

 

उन्हाळ्यात हे 3 घरगुती फेसपॅक लावा (Apply These 3 Homemade Face Packs In Summer)

उन्हाळ्यात ऊन आणि उष्ण हवेपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेले घरगुती फेसपॅक खूप फायदेशीर ठरतात. हे फेसपॅक कसे वापरायचे ते जाणून घेऊया (Skin Care In Summer ).

 

 

1. दही आणि टरबूज फेस पॅक (Curd And Watermelon Face Pack)

दही आणि टरबूज फेस पॅक बनवण्यासाठी टरबूजाचे तुकडे आणि दही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर चांगली लावा आणि 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर थंड स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक त्वचेला उन्हापासून होणार्‍या सुरकुत्यांपासून वाचवतो.

 

2. कोरफड जेल आणि लिंबू फेस पॅक (Aloe vera Gel And Lemon Face Pack)

एलोवेरा जेल त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि पोषण देण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि लिंबू त्वचा घट्ट आणि रंग उजळ करते. 2 चमचे एलोवेरा जेल आणि 2 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक चेहर्‍यावरील तेल काढून टाकण्यासही मदत करतो.

 

3. गुलाब पाणी आणि चंदनाचा फेस पॅक (Rose Water And Sandalwood Face Pack)

उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देणे खूप गरजेचे असते.
यासाठी तुम्ही गुलाबपाणी आणि चंदनापासून बनवलेला घरगुती फेस पॅक वापरू शकता.
हा फेसपॅक बनवण्यासाठी 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यानंतर धुवा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Skin Care In Summer | skin care in summer homemade face pack curd watermelon aloe vera lemon gulab jal sandalwood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा