Sleeping Reasons | रात्री झोपल्यानंतर सुद्धा अखेर का येते दिवसभर झोप? हे घरगुती उपाय बनवतील ‘अ‍ॅक्टिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sleeping Reasons | निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहारासोबतच भरपूर झोपही आवश्यक असते. चांगले जेवण आणि पुरेशी झोप घेत असाल तर रोग दूर राहतात. प्रत्येकाने रात्री ७ ते ८ तास चांगली झोप घ्यावी (Sleeping Reasons). पण काही लोकांना गरजेपेक्षा जास्त झोप येते. रात्रभर भरपूर झोप घेऊनही दिवसभर आळस जाणवतो. ही देखील काही आजाराची लक्षणे असू शकतात. सतत थकवा किंवा झोप येत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया (Tips To Overcome From Too Much Sleeping).

१. रात्री उशिरा झोपत असाल, तर यामुळे दिवसभर आळस आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रात्री लवकर झोपा.

२. दररोज शारीरिक हालचाली करा. यामुळे रात्री लवकर झोप येईल. (Sleeping Reasons)

३. ओव्हर थिंकिंग थांबवा. झोपेची वेळ ठरवा.

४. रात्री खोलीत चांगले वातावरण तयार करा. जेणेकरून लवकर झोप येईल. अंधार करून झोपा.

५. रात्री हलका आहार घ्या. जास्त जेवल्याने झोप येणे कठीण होते.

सतत झोप का येते?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत झोप येते त्याला हायपरसोमनिया (Hypersomnia) ची समस्या म्हणतात. या आजारात रात्री खूप झोपल्यानंतरही दिवसा सुस्ती आणि झोप येते. ज्यामुळे दिनचर्येवर परिणाम होतो. हा आजार जास्त ताण आणि नैराश्यामुळे होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी चहा-कॉफीचे सेवन टाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न