Small Saving Schemes | पुन्हा वाढले नाहीत PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Small Saving Schemes | शेअर बाजारात (Share Market) सतत घसरण होत असून क्रिप्टोकरन्सी (Crypto Currencies) च्या गुंतवणूकदारांची अवस्था वाईट आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. अशा गुंतवणूकदारांना छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा होती, कारण गेल्या वर्षभरात सरकारी रोख्यांवर (Govt Bond) रिटर्न वाढला आहे. (Small Saving Schemes)

 

बॉन्ड यील्ड (Bond Yield) मध्ये वाढ झाल्यामुळे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Privident Fund), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) यासारख्या लहान बचत योजनांमध्येही (Small Saving Schemes) वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, सरकारने 2022-23 च्या दुसर्‍या तिमाहीसाठीही या योजनांचे व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सरकारने केली ही घोषणा
सरकारने गुरुवारी सांगितले की, NSC, PPF आणि इतर लहान बचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून या लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (Small Saving Schemes)

 

अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, लहान बचत योजनांचे व्याजदर 1 जुलै 2022 पासून सुरू होणार्‍या आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी संपणार्‍या दुसर्‍या तिमाहीसाठी जुन्या स्तरावर कायम ठेवण्यात आले आहेत. हे दर पहिल्या तिमाहीत जाहीर केलेल्या स्तरावर राहतील.

हा आहे व्याजाचा फार्म्युला
लोक अंदाज बांधत होते की, लहान बचत योजनांचे व्याजदर वाढू शकतात. खरे तर गोपीनाथ समितीने 2011 मध्ये अल्पबचत योजनांच्या व्याजाचा फार्म्युला सांगितला होता.

 

फार्म्युलात म्हटले होते की, सरकारी बाँडचे यील्ड वाढल्यानंतर लहान बचत योजनांचे व्याजही वाढले पाहिजे. समितीने या बचत योजनांचे व्याज कोणत्याही कालावधीतील सरकारी बाँड (Govt Securities) च्या सरासरी यील्डपेक्षा 0.25 ते 01 टक्के जास्त ठेवण्याची शिफारस केली होती.

 

इतके वाढू शकते व्याज
गेल्या एका वर्षात, बेंचमार्क 10-इयर बाँडचे यील्ड 6.04 टक्क्यांवरून 7.46 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एप्रिल-जून तिमाहीत त्याची सरासरी 7.31 टक्के आहे. गोपीनाथ समितीच्या शिफारशींनुसार व्याजदर निश्चित केले असते, तर पीपीएफवरील व्याज (Interest on PPF) 7.81 टक्क्यांपर्यंत वाढले असते.

 

मात्र, आताही पीपीएफवर फक्त 7.10 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, सुकन्या समृद्धी योजना आणि
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर 08 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा होती.
सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीत, व्याज दर 7.60 टक्क्यांवरून 8.06 टक्क्यांपर्यंत आणि
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या बाबतीत 7.40 टक्क्यांवरून 8.31 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

या लोकांनाही झाला असता फायदा
जर लहान बचत योजनांचे दर वाढवले गेले तर त्याचा फायदा आरबीआयच्या फ्लोटिंग रेट बाँड्सच्या गुंतवणूकदारांनाही झाला असता.
अशा प्रकारच्या बाँडचे दर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या व्याज दराशी जोडलेले असतात.

 

हे बाँड राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांपेक्षा 0.35 टक्के जास्त दर देतात. सध्या, एनएससी वर 6.8 टक्के व्याज दिले जात आहे
आणि यामुळे आरबीआयच्या फ्लोटिंग बाँड (RBI Floating Rate Bond) चा दर 7.15 टक्के आहे.
फॉर्म्युलाचे पालन केल्यानंतर, एनएसएसी दर 7.15 टक्के होण्याचा अंदाज होता. मात्र, सरकारच्या घोषणेनंतर आता या सर्व अंदाजांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title :- Small Saving Schemes | small saving schemes sukanya samriddhi yojana public provident fund national saving certificate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या