Small Savings Schemes | दिवाळीत निवडा चांगली बचत योजना ! जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना, PPF, SCSS आणि KVP पैकी चांगला पर्याय कोणता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Small Savings Schemes | भारत सरकारद्वारे अनेक छोट्या बचत योजना (Small Savings Schemes) चालवल्या जात आहेत. सरकार या बचत योजनांवर मिळणार्‍या व्याजदरात प्रत्येक तिमाहीत बदल सुद्धा करते. या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास 4 ते 7.6 टक्के व्याज मिळते. आपण आज काही अशा बचत योजना जाणून घेणार आहोत ज्यांच्यात गॅरेंटेड रिटर्न मिळवू शकता.

 

Small Savings Schemes योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP), वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश आहे.

 

सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana)
या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते. जर तुम्ही दरमहिना 3000 रुपये गुंतवले म्हणजे वार्षिक 36000 रुपये तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होते.

 

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF)
Post Office Public Provident Fund (PPF) एक रिटायर्मेंट प्लानिंगवर फोकस करणारे इंस्ट्रूमेंट आहे. सोबतच हे खाते टॅक्स स्थितीच्या ’सूट, सूट, सूट’ (EEE) श्रेणी अंतर्गत येते, ज्याचा अर्थ आहे की रिटर्न, मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज उत्पन्नात प्राप्तीकरातून सूट मिळेल. योजनेत दरवर्षी 7.1 टक्के व्याज मिळते, जे वार्षिक प्रकार मिश्रित असते.

 

वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) एका गुंतवणूक अव्हेन्यूप्रमाणे काम करते आणि निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी पैसे जमा करण्यास मदत करते. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये दरवर्षी 7.4 टक्के व्याज मिळते.

किसान विकासपत्र (KVP)
किसान विकास पत्र पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता. याची सुरुवात 1000 रुपयांपासून होते. हे बाँडप्रमाणे प्रमाणपत्राच्या रूपात जारी केले जाते. यावर सरकारकडून ठरलेले व्याज मिळते. सरकार दर महिन्यासाठी व्याज दर ठरवते. 6.9 टक्केच्या व्याजदाराने या स्कीम अंतर्गत 9 वर्ष आणि 2 महिने म्हणजे 110 महिन्यात पैसे डबल होतात. (sukanya samriddhi yojana)

 

Web Title :- Small Savings Schemes | earn money in this diwali know best govt small savings schemes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PNB MySalary Account | तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये अकाऊंट तर ‘मोफत’ मिळेल 20 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

PM Mudra Yojana | मोदी सरकार मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1999 रुपये जमा केल्यानंतर 10 लाखांचे कर्ज देतंय का? जाणून घ्या सविस्तर

MLA Vinayak Mete | ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – आ. विनायक मेटे