PM Mudra Yojana | मोदी सरकार मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1999 रुपये जमा केल्यानंतर 10 लाखांचे कर्ज देतंय का? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Mudra Yojana | मोदी सरकारने (Modi Government) छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (PM Mudra Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना आपल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज वायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की, सरकार केवळ 1999 रुपये जमा केल्यानंतरच 10 लाखापर्यंतचे कर्ज देत आहे. या मेसेजची सत्यता जाणून घेवूयात…

 

ही आहे वायरल मेसेजची सत्यता
वायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे, केंद्र सरकार मुद्रा योजनेंतर्गत (PM Mudra Yojana) इंटरनेट बँकिंग चार्ज 1999 रुपये जमा केल्यास 2% व्याजदराने कर्ज देत आहे.

 

सरकारने मेसेज बनावट असल्याचे सांगितले
पीआयबी (PIB) फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटरवरून याबाबत सावध केले आहे की, पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत असे कोणतेही पत्र जारी केलेले नाही. हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे.

काय आहे PM मुद्रा योजना  
मुद्रा योजनेत विना गॅरंटी कर्ज मिळते. याशिवाय सरकारकडून या कर्जासाठी कोणताही प्रोसेसिंग चार्ज नाही. मुद्रा योजनेत कर्ज फेडण्याचा कालावधी 5 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकता. योजनेंतर्गत कोणतेही निश्चित व्याजदर नाही. विविध बँका मुद्रा कर्जासाठी विविध दराने व्याज आकारतात.

 

मुद्रा कर्ज प्रकार :
1. शिशु कर्ज अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

2. किशोर कर्ज अंतर्गत 50,000 रुपये ते 5 लाख कर्ज मिळते.

3. तरुण कर्ज अंतर्गत 5 लाख रुपये ते 10 लाख रुपये कर्ज मिळते.

 

Web Title :- PM Mudra Yojana | earning money modi govt give rs 10 lakh loan deposite on rs 1999 under pm mudra yojana check details in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Vinayak Mete | ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – आ. विनायक मेटे

Kirit Somaiya | ‘दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा

Aryan Khan | जेलमधून बाहेर आलेल्या आर्यनला धक्का, शाहरुख आणि गौरीने मुलासाठी घेतला मोठा निर्णय