कोरेगांव पार्कमध्ये स्मार्ट बायसिकल शेअरिंग सेवा

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कोरेगांव पार्कमधील पिंगळे पार्क येथे बायसिकल शेअरिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी २०० सायकली तैनात करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d394c98-9a48-11e8-abbd-9d5542913e9f’]

या सेवेचे उद्घाटन उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका मंगला मंत्री, लता धायरकर, नगरसेवक उमेश गायकवाड, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, कोरेगांव पार्क नागरी कृती समितीचे अध्यक्ष योगेश पिंगळे, सहाय्यक आयुक्त अरुण खिलारी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, औंध या ठिकाणी ही सायकल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.