दोनशे शाळांना स्मार्ट बोर्ड बसवणार : विजय भंडारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहराला स्मार्ट सिटी बनवायचे असेल तर या शहरात शिकणाऱ्या विद्यार्थांना देखील स्मार्ट शिक्षण मिळाले पाहिजे. या संकल्पनेतून लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड ट्रस्ट यांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळा व विनाअनुदानीत शाळा या शाळेमध्ये सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या स्मार्ट बोर्ड बसवण्याचे कार्य हाती घेतले असुन येत्या काळात शहरातील दोनशे शाळेत हे सर्व विद्यार्थी स्मार्ट शिक्षण घेताना दिसतील अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड ट्रस्ट यांच्या वतीने येत्या २७ तारखेला सायंकाळी ७ वाजता. गणेश कला क्रीडा मंदीर स्वारगेट येथे या शिक्षणाच्या भगीरथ कार्यासाठी “एक शाम कुमार विश्वास के नाम” या हस्य कवी संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनामध्ये हास्य कवी कुमार विश्वास,संपत सरल,भुवन मोहिनी,रमेश मुस्कान,दिलीप शर्मा हे सहभागी होणार आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce461be9-c0a8-11e8-9f4f-0bc12bd7e264′]

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड ट्रस्ट यांनी ५८ शाळेमध्ये हे स्मार्ट बोर्ड बसवले असुन ४२ शाळेमध्ये हे स्मार्टबोर्ड बसवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच शहरात १ ई टाँयलेट बसवले असुन येत्या काळात आणखी ९ ई टाँयलेट बसवण्यात येणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी,राजीव अग्रवाल,द्वारका जालन,शाम खंडेलवाल यांनी दिली.यावेळी कवी दिलीप शर्मा यांची देखील उपस्थिती होती.

तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही : नितेश राणे

[amazon_link asins=’B00KGZZ824,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d8b17cd-c0aa-11e8-a750-bd4a1a05fb10′]