साप तडफडत राहिला, गरूडाने मात्र त्याला कच्च रगडलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक जणांना सापाची भीती वाटत असते. तर अनेकांना तो आवडतच नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक गरुड सापाला खाताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला सापाविषयी सहानुभूती वाटू शकेल. मात्र गरुड त्याला निर्दयीपणे फाडून खाताना दिसून येत आहे. हा व्हीडीओ दक्षिण आफ्रिकेतील असून एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

क्रूगर नॅशनल पार्कमध्ये फिरत असताना त्याने हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात शूट केला. ज्यामध्ये हा गरुड सापाला खाताना दिसून येत आहे. या व्हिडिओत आपल्याला दिसते कि, साप त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो मात्र गरुडाच्या इच्छाशक्तीपुढे तो कमी पडतो आणि हळूहळू संपूर्णपणे तो गरुडाच्या ताब्यात जातो. त्यानंतर गरुड त्याला शेपटीपासून फाडण्यास  सुरुवात करतो. साप खूप प्रयत्न करतो मात्र शेवट तो हार पत्करतो.

दरम्यान, या घटनेला कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या ग्रीम मिचले यांनी या घटनेविषयी सांगितले कि, गरुडाने त्याला खूप उत्तमरीत्या आपल्या पायांनी पकडून ठेवले होते. त्यानंतर त्याला खाली पडून त्याच्या पाठीवर पाय देऊन मणका मोडला त्यामुळे सापाला हालचाल करण्यास अडचण आली आणि शेवटी गरुडाचा विजय झाला.

आरोग्यविषयक वृत्त