घर साफ करणाऱ्या गृहिणीला अचानक होऊ लागलं कसंतरी, पाठीमागे वळून पाहिलं तर दिसलं ‘जनावर’

छत्तीसगड : वृत्तसंस्था – पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरांमध्ये साप निघण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असतात. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्यादेखील या काळात वाढते. या काळात सापांचे रक्षण व्हावे म्हणून नागपंचमीसारखा सण पूर्वजांनी साजरा करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. आता ऐन नागपंचमीच्या काळात छत्तीसगढ़ मधील धमतरी जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली.
Sneak
येथील एक महिला आपल्या घरात साफसफाईचे काम करत होती. तेव्हा अचानक तिच्या पाठीला काहीतरी चावल्यामुळे दुखले कामाच्या नादात मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर परत एकदा दुखणे सुरु झाल्यानंतर तिने मागे पहिले मात्र मागील पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. घराच्या दरवाजाच्या कोपऱ्यात चक्क साप बसला होता. त्यानंतर तिने आरडाओरड केला आणि घरातील सदस्यांना साप चावल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ या महिलेला दवाखान्यात दाखल केले गेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र महिलेचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आले.


मिळलेल्या माहितीनुसार गतापार येथील निवासी असणारी महिला कामती बाई साहू (४२) आपल्या घरात काम करत असताना तिला सर्पदंश झाला मात्र उंदीर असल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र हेच दुर्लक्ष करणे तिच्या जीवावर बेतले असून यामुळे तिचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या उपचारानंतर या महिलेच्या झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून या आकस्मिक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

आरोग्यविषयक वृत्त