…म्हणून ‘मैने प्यार किया’ नंतर सिनेमांपासून दूर होते, अभिनेत्री भाग्यश्रीनं पहिल्यांदाच सांगितलं ‘गुपित’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार भाग्यश्री हिनं सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून डेब्यू केला होता. 1989 मध्ये आलेल्या या पहिल्याच सिनेमातून तिनं लोकांच्या मनात घर केलं. हा सिनेमा आला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. या सिनेमाच्यावेळीच भाग्यश्री आणि हिमालय दसानी रिलेशनशिपमध्ये होते. भाग्यश्री बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती. यावर आता तिनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. कुटुंबासाठी तिला हा कठिण निर्णय घ्यावा लागला असं ती सांगते.

एका मुलाखतीत बोलताना भाग्यश्री म्हणाली, “जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा त्याच्या येण्यानंतर माझं सर्व लक्ष त्याच्याकडे होतं. मला अभिमन्युला (मुलगा) वेळ देण्यातच खूप आनंद वाटायचा.”

अभिमन्यु पुन्हा भाग्यश्रीला सिनेमात येण्यासाठी प्रेरीत करत आहे. अभिममन्यु सांगतो, “जेव्हा मी मर्द को दर्द नहीं होता हा सिनेमा साईन केला होता तेव्हापासून म्हणत आहे की, एकदा हा सिनेमा येऊ दे नंतर मी तुला या दुनियेतून फिल्मी दुनियेत घेऊन जाईन. मला वाटतं की तू खुलून आयुष्य जगावं. आईला पुन्हा स्क्रीनवर पाहणं अद्भूत असेल.”

मुलाच्या या वक्तव्यावर भाग्यश्री म्हणते, “मुलं लहान असतात तेव्हा त्यांना वाटतं की आईनं आसापास रहावं. आता अभिमन्यु काम करत आहे तर त्याला वाटत आहे त्याल कसं वाटत आहे. त्यामुळं त्याला पुन्हा मला सिनेमात पाहण्याची इच्छा आहे.

अभिमन्युच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त मर्द को दर्द नहीं होता या सिनेमातून त्यानं करिअरला सुरुवात केली होती. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर आता लवकरच तो निकम्मा या सिनेमात शिल्पा शेट्टीसोबत काम करताना दिसणार आहे.