‘ब्युटी’ कॉन्टेस्ट जिंकण्याची एवढी ‘आग’, सौंदर्यवती कापतात पोटातील ‘आतडे’, काहींनी गमावला जीव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक मुली अशा आहेत ज्यांना ब्युटी कॉन्टेस्टचा खूप छंद असतो. या स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक मुली सर्जरी करतात. तर काही मुली एखाद्या ट्रीटमेंटची मदत घेतात. एक असा देशही आहे जिथे मुली मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स बनण्यासाठी स्वत:ला त्रास करून घ्यायला मागे-पुढे पहात नाहीत. आज अशाच एक देशाबद्दल जाणून घेणार आहोत जिथं मुली मिस वर्ल्ड बनण्यासाठी असंच काहीसं काम करतात जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.

आम्ही ज्या देशाबद्दल बोलतोय तो देश आहे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेजुएला. व्हेनेजुएला या देशानं ब्युटी इंडस्ट्रीत आपली खास ओळख तयार केली आहे. आतापर्यंत या देशानं 7 मिस युनिव्हर्स, 6 मिस वर्ल्ड, 7 इंटरनॅनशल आणि 2 मिस अर्थ असे टायटल जिंकले आहेत.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल. अशा प्रकारचं यश मिळवण्यासाठी मुलींना 4 वर्षांच्या असतानाच फॅशन स्कुलमध्ये पाठवलं जातं. मुलींना तरुण दिसण्यासाठी किंवा स्लिम दिसण्यासाठी इंजेक्शन्सही दिले जातात जे खूपच घातक असतात.

धक्कादायक बाब अशी की, इथे मुलींच्या पोटातील आतडेही कापले जातात. यामुळे त्यांना जास्त भूक लागत नाही आणि याचा परिणाम असा होतो की, त्या स्लिम राहतात. या गोष्टीमुळं अनेक मुलींचा मृत्यूही झाला आहे.