तर आम्हीही नक्षलवादी आहोत, सकल मराठी समाजाचे अनोखे आंदोलन

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना नक्षलवादी बोलल्याचा निषेध करण्यात आला. नक्षलवादी बोलणाऱ्यांचे मुखवटे घालून सकल मराठी समाजाच्यावतीने पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. होय मी नक्षलवादी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जर नक्षलवादी असतील तर होय मी नक्षलवादी आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे मुखवटे घालून आंदोलन करण्यात आले.

पोलीस प्रशासनातील अधिकारी यांनी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर नक्षल वादाचा आरोप गंबीर विधान केले . फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आरोप केल्यासारखे आहे . असे विधान करणारे पुणे शहर पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांची निवृत्त न्यायाधीश यांचे मार्फत शासनाने चौकशी करावी . अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सकल मराठी समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

[amazon_link asins=’B01ERB446I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’011f1440-806b-11e8-b01f-432e06727639′]

हे आंदोलन सकल मराठी समाजाचे समन्वयक राजेश खडके , भीम साम्राज्य संघटेनचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले ,  वतन बचाओ आंदोलनाचे सचिव विश्वनाथ गायकवाड, मानवी हक्क महासंघाचे अशोक माने, जनता संघर्ष दलाचे फिरोज मुल्ला, वतन बचाओ आंदोलनाचे खजिनदार सुभाष जाधव ख्रिश्चन मोमेंटचे अमित उतर्यम, मजदूर संघाचे अर्जून ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने, भारीपचे अक्षय तायडे, हर्षद कांबळे आदी मान्यवर सहभागी झाले होते .