लष्कराच्या वर्दीत महेंद्रसिंह धोनीनं केलं ‘बूट’ पॉलिश, ‘या’ फोटोनं सगळयांची मनं जिंकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार आणि खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून या कालावधीत तो भारतीय सैनिकांबरोबर काश्मीरमध्ये असून लष्कराबरोबर काम करत आहे.

धोनी मागील महिन्यात १०६ TA या बटालियनमध्ये रुजू झाला असून काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचे काम तो करत आहे. १५ ऑगस्टपर्यंत तो या ठिकाणी राहणार असून सध्या तो लष्कराची सेवा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये धोनी लष्करी वेशात असून यामध्ये तो बूटपॉलिश करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर धोनी सध्या राहत असलेली खोली देखील फार लहान असल्याचे दिसून येत आहे. या फोटोवर विविध कमेंट आल्या असून नागरिकांनी यावर धोनीचे कौतुक करताना म्हटले आहे कि, १०० कोटींहून जास्त रुपये कमावणारा धोनी जेव्हा बूट पॉलिश करतो आणि जवानांसोबत राहतो तेव्हा खरी माणुसकी कळते. धोनी या ठिकाणी लष्कराची सेवा करत असून तो अनेकदा सैनिकांबरोबर व्हॉलीबॉल खेळतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. धोनी सध्या या ठिकाणी ५० ते ६० सैनिकांबरोबर राहत आहे.

दरम्यान, धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून भविष्यात तो काय निर्णय घेणार याकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –