नाईट शिफ्टमुळं वैतागलेल्या इंजिनिअरनं मागवले 600 मुलींचे ‘नग्न’ फोटो, पुढं झालं ‘असं’ की विचारूच नका !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हैद्राबाद मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिस ला काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वतःला हॉटेल मधील एचआर मॅनेजर असल्याचे भासवून देशातील विविध १६ राज्यांतील ६०० मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मागवले. त्याने त्या फोटोंचा वापर करून तरुणींना पैशासाठी ब्लॅकमेल करू लागला होता. आरोपी अभियंता क्लेमेंट राज चेझियान उर्फ प्रदीप याला सायबराबाद पोलिसांनी त्याच्या चेन्नई येथील घरातून अटक केली आहे.

हैदराबादच्या एका महिलेने प्रदीपविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. असे सांगितले जाते कि, आरोपीच्या जाळ्यात आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्‍ट्र, तमिळनाडु आणि दिल्‍ली येथील १६ राज्यांतील मुली होत्या. ह्या मुलींकडून आरोपीने लाखो रुपये हडप केले होते.

आत्तापर्यंत केलेल्या तपासात हे उघड झालेले आहे कि, आरोपी एका मोठ्या आईटी कंपनी मध्ये काम करतो. आरोपी आपल्या घरातूनच एक आभासी एचआर ऑफिस चालवत होता. तपासात हे माहित झाले कि, आरोपी प्रदीपने हे स्वीकारले कि, त्याने ६०० मुलींना धोका दिला आहे. आरोपीने सांगितले कि, तो नाईट शिफ्ट मुळे परेशान होता. त्यामुळे तो तरुणींचे नंबर मिळवून त्यांना ब्लॅकमेल करू लागला होता.

घरामध्ये एकटा आणि निराश असायचा
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने असे सांगितले कि, आरोपी प्रदीप अनेकदा रात्रीच्या शिफ्ट मध्ये असायचा. त्याची बायको दिवसा काम करत असे. यामुळे तो घरात एकटा आणि निराश असायचा. त्याने मजेसाठी म्हणून, त्याने ई-क्‍लासीफाइड पोर्टलच्या माध्यमातून मुलींचे संपर्क क्रमांक घेण्यास सुरुवात केली. लवकरच त्याने या नंबरचा वापर करून त्यांना ब्लॅक मेल करण्यास सुरु केले.

जॉबच्या आकर्षणामुळे तरुणी जाळ्यात
सुरवातीला तरुणींसमोर तो फोनवर बोलत असे. बोलताना तो त्यांना सांगत असे कि, हॉटेल फ्रंट ऑफिस च्या जॉब साठी त्याला सुंदर मुलीची गरज आहे,  त्या शोधात आहे. आरोपी ने सुरवातीला एका तरुणीच्या मदतीने न्यूड फोटो मागवणे सुरु केले होते. त्यानंतर आरोपी प्रदीप तरुणींना व्हिडीओ कॉल करून लाईव्ह कपडे उतरवायला सांगत असे. प्रदीप एका सॉफ्टवेअरच्या मदतीने तरुणींचे न्यूड व्हिडीओ बनवत असे. आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like