Solapur ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API), शिपाई आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यामध्ये नॉमिनल अटक करुन जामिनावर (Bail) सोडण्यासाठी 30 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (API) , पोलीस शिपाई (Police Constable) आणि चहा कॅन्टीन चालवणाऱ्या व्यक्तीला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.11) करण्यात आली. सोलापूर एसीबीच्या पथकाने (Solapur ACB Trap) केलेल्या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस (Solapur Rural Police) दलात खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ जयजयराम खूने API Nagnath Jayajairam Khoone (वय-35), पोलीस शिपाई सुनील पुरभाजी बोधमवाड Sunil Purbhaji Bodhamwad (वय-31) आणि चहा कॅन्टीन चालक हसन इस्माईल सय्यद (वय-65) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत 29 वर्षाच्या व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे (Solapur ACB Trap) तक्रार केली आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या भावाविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात (Pangri Police Station) गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यामध्ये दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर (Pre-Arrest Bail Granted) केला आहे. गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या भावाला नॉमिनल अटक (Arrest) करुन जामिनावर सोडवण्यासाठी तपासी अधिकारी नागनाथ खूने आणि पोलीस शिपाई सुनील बोधमवाड यांनी प्रत्येकी 15 हजार असे एकूण 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली.

सोलापूर एसीबीच्या पथकाने 28 डिसेंबर 2022 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक खूने आणि पोलीस शिपाई बोधमवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम चहा कॅन्टीन चालवणाऱ्या हसन सय्यद याच्याकडे देण्यास सांगितले.
बुधवारी सापळा रचण्यात आला.
हसन सय्यद याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची 30 हजार रुपये रक्कम घेताना रंगेहात पकडले.
यानंतर नागनाथ खूने आणि सुनिल बोधमवाड यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे
पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार (DySP Ganesh Kumbhar), पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक
(Police Inspector Umakant Mahadik), पोलीस अंमलदार कुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे,
गजानन किनगी, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली.

Web Title :- Solapur ACB Trap | Assistant Police Inspector (API), constable and private man caught in anti-corruption net while taking Rs 30,000 bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadanvis | ‘मागचं सरकार फेसबुकवर लाईव्ह होतं अन् जनतेत मृत होतं’; देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाविकास’ सरकारवर हल्लाबोल

Ramdas Kadam | रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’