Solapur ACB Trap | लाच घेताना सोलापूर मनपाचा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोजमाप पुस्तिकेवर सही करण्यासाठी 13 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सोलापूर मनपातील (Solapur Municipality) सहायक अभियंत्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुनील नेमिनाथ लामकाने Sunil Neminath Lamakane (वय 57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे (Assistant Engineer) नाव आहे. सोलापूर एसीबीने (Solapur ACB Trap) ही कारवाई लामनकाने यांच्या कार्यालयात केली.

 

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे (Solapur ACB Trap) तक्रार केली आहे. लामकाने हे महापालिकेत गलिच्छवस्ती सुधारणा तांत्रिक विभागात सहायक अभियंता आहेत. ठेकेदाराने (Contractor) मनपा हद्दीमधील शेळगी ते स्मशानभूमी व तुळजापूर वेस येथील बारामती बँक ते आकाशगंगा मंदिरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. या कामाच्या मोजमाप पुस्तकावर सही करण्यासाठी लामकाने याने 13 हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी ठेकेदाराने तक्रार केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करुन सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना लामकाने यांना त्यांच्याच कार्यालयात पकडण्यात आले.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (Police Inspector Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Solapur ACB Trap | Engineer of Solapur municipality caught in anti-corruption net while taking bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा