Solapur Crime News | खळबळजनक ! पोलिसांना पाहताच विवाहितेची जळती चिता सोडून नातेवाईकांनी काढला पळ; धक्कादायक बाब समोर

सोलापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Solapur Crime News । स्मशानभूमीत विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार सुरु असताना पोलीस पोहचताच उपस्थित नातेवाईकांनी विवाहितेची जळती चिता सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) येथील खळबळजनक घटना समोर आली आहे. पल्लवी मनोज राऊत (Pallavi Manoj Raut) असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. मृत पल्लवीची हत्या (Murder) केल्यांनतर देखील नातेवाईकांनी तिने आत्महत्या केल्याची बतावणी केल्याचा कट रचला (Crime) आहे. पोलीस स्मशानभूमीत येताच नातेवाईक तेथून पलायन झाले आहेत. यावरून परिसरात खळबळ उडाली आहे. Solapur Crime News | married woman murdered by husband and other relative plot as suicide four arrest malshiras

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘ही घटना 8 जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे घडली आहे.
मृत पत्नी पल्लवी आणि आरोपी पती मनोज राऊत (Manoj Raut) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबीक भांडण होते.
तर गेल्या दीड वर्षात त्यांच्या दोघांमध्ये अनेकवेळा मोठी भांडणं झाली आहे.
तसेच, आरोपी पतीकडून मृत पल्लवी यांना अनेक वेळा बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, पतीच्या सातत्याने मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून काही दिवसापूर्वी पल्लवी यांनी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या.
काही दिवसांनी पल्लवीचा ठावठिकाणा लागल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला परत घरी आणलं होतं. यांनंतरही त्यांच्यातील वाद काही कमी झाला नाही.
यामधून संशयित आरोपीने पल्लवी यांना किरकोळ कारणातून बेदम मारहाण (Beating) केली.
यात पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला.

या दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्यांनतर आरोपींनी पुरावा (Proof) नष्ट करण्यासाठी, पीडिते महिलेनं आत्महत्या केल्याचा कट रचला.
कोणालाही न सांगता गुपित अंत्यसंस्कार आटोपण्याचे व्यवस्थापन करण्यात आले.
नंतर याबाबत माहिती पोलिसांना समजताच तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
स्मशानभूमीत पोलिसाना पाहताच आरोपी नातेवाईक पलायन झाले.
याप्रकरणी पोलीसांनी 4 आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
चारही जणांना अटक केली असून कोर्टानं (Court) त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे. पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत, मृताची आई सुरेखा गौतम गवळी,
भाऊ विशाल गौतम गवळी असं न्यायालयीन कोठडी मिळालेल्या 4आरोपींची नावे आहेत.

Web Title : Solapur Crime News | married woman murdered by husband and other relative plot as suicide four arrest malshiras

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Monsoon Update | पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rajasthan News | धक्कादायक ! सेल्फी काढताना अचानक वीज कोसळल्याने 11 जण जागीच ठार

IND vs SL | श्रीलंका क्रिकेटने जारी केले सीरीजचे नवीन वेळापत्रक, येथे पहा पूर्ण शेड्यूल