Solapur Crime News | शेतजमीन नावावर न केल्याच्या रागातून 4 वर्षीय पुतणीची हत्या, सोलापूर हादरलं

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | सोलापूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. “माझ्या आईच्या नावावरील शेतजमीन माझ्या नावावर करून न देण्यासाठी तुम्ही दोघे नवरा बायकोच जबाबदार आहात”. याचा राग मनात धरुन “तुमचा वंशजच शिल्लक ठेवत नाही”, अशी धमकी देत सख्ख्या भावाच्या 4 वर्षाच्या चिमुरडीची काकाने हत्या केली आहे. नराधम काकाने झोपेत असलेल्या पुतणीचं तोंड आणि नाक दाबून ही हत्या केली आहे. यानंतर त्याने तिचा मृतदेह मलिकपेठ येथील सिना नदीच्या पात्रात टाकून दिला. (Solapur Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
शेतजमिनीसाठी नात्याला काळीमा फासणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील डिकसळ या ठिकाणी २० फेब्रुवारी रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यशोदीप शिवाजी धावणे (वय 32) असे या प्रकरणातील आरोपी काकाचे नाव आहे. याबाबत यशोधन शिवाजी धावणे यांनी मोहोळ पोलिसांत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील यशोधन शिवाजी धावणे हे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची गावाच्या कडेला एकूण 16 एकर जमीन आहे. त्यापैकी स्वत: यशोधन यांच्या नावावर पाच एकर आणि भाऊ यशोदीप याच्या नावावर पाच एकर व राहिलेली सहा एकर शेतजमीन आईच्या नावावर आहे. भाऊ यशोदीप हा मागच्या तीन वर्षांपासून आईच्या नावावर असलेली सहा एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून देण्यासाठी घरातील सर्व लोकांना त्रास देत होता. गावातील प्रतिष्ठित लोकांनी व नातेवाईकांनी वेळोवेळी “तुमचे आई वडील असेपर्यंत त्यांच्या नावावर राहू दे. नंतर ते सहा एकर तुम्हा दोघं भावांच्याच नावावर होणार आहे आणि आम्ही करून देऊ”, अशी समजूत काढली. मात्र तरीदेखील तो ऐकायला तयार नव्हता. त्याच्या मनात या गोष्टीचा राग होता. (Solapur Crime News)

पुतणीची केली हत्या
20 फेब्रुवारीला सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास यथोधन, पत्नी योगीता आणि आई हे शेतातील कामे करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी यशोधन यांची मुलगी घरात झोपलेली होती.
शेतातील काम करून सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास यशोधन घरी आले असता त्यांना त्यांची मुलगी
घरात दिसली नाही. तेव्हा त्यांनी सर्वांना फोन करून मुलींबाबत विचारणा केली मात्र तिचा कुठेच पत्ता लागला नाही.

मलिकपेठच्या बंधाऱ्यात आढळला मृतदेह
यानंतर यथोधन याने भाऊ यशोदीप याला फोन लावून “मुलगी घरात नाही. कुठे आहेस तू मुलीला पाहिलस का?,
असं विचारले असता त्याने “मी तुझ्या मुलीला ठार मारून मलिकपेठ येथील सिना नदीपात्रात पाण्यात टाकून”,
दिल्याचे सांगितले. यानंतर यथोधन याने तातडीने मलिकपेठ या ठिकाणी धाव घेतली असता सिना नदीच्या
पात्रात त्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. मोहोळ पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल
करून आरोपी यशोदीपला अटक केली आहे.

Web Title :-  Solapur Crime News | uncle takes the life of his niece over agricultural land dispute in mohol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’