पाकिस्तानकडून गोळीबार , एक जवान शहीद , ३ जखमी

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून कुरापती चालूच आहेत .  आज (सोमवारी ) सकाळी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शश्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी सुंदरबनी सेक्टरमध्ये छोट्या शस्त्रांद्वारे गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला .  याला भारतीय जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले . याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अखनूरमधील केरी बट्टाल भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले . यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून तीन जण जखमी झाले आहेत .  याबाबत लष्कराचे प्रवक्ते लेफ्ट. कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले की , पाकिस्तानकडून सुरुवातीला नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले . यावेळी त्यांनी छोट्या शत्रांद्वारे गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला . याला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले त्यानंतर सकाळी सव्वासातच्या सुमारास हा गोळीबार थांबला.

दरम्यान , पाकिस्तानी रेंजर्सने नियंत्रण रेषेजवळील ‘चक्कान दा बाग’  येथील क्रॉस पॉईंटजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते . पाकिस्तानी रेंजर्सकडून यापूर्वी गेल्या बुधवारी पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like