मार्केटमधील प्रॉडक्टला करा ‘बाय-बाय’, केसांसाठी करा फक्त ‘हे’ 6 घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या घरातील जेष्ठ मंडळी आपल्याला नेहमी पालेभाज्य आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करतात. मात्र, नेहमी आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो. हिरव्या पालेभाज्या आणि फळ आरोग्या सोबतच त्वचा आणि केसाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात. अनेकवेळा त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा आधार घेतो. परंतु, त्याशिवाय जर नैसर्गिक उत्पादनांचा आधार घेतला तर त्यामुळे समस्या दूर होण्याबरोबर आरोग्य चांगलं राखण्यास सुद्धा मदत होते.

जर तुम्हाला केस गाळण्याची समस्या उद्भवत असेल तर आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरात असलेल्या गोष्टींचा वापर करुन तुमचे केस मुलायम आणि दाट कसे कराल याबाबतची माहिती देणार आहोत.

१. अवोकाडो

अवोकाडोचा वापर करुन कोरड्या आणि निस्तेज केसांपासून सुटका मिळवू शकता. त्यामधील असणारे पोषक तत्वे व्हिटॅमिन बी आणि ई सारखी पोषक तत्वे केसांच्या समस्या दूर करतात. त्याकरता अवोकाडोची पेस्ट २० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा.

२. गाजर

गाजराचे दररोज सेवन केल्यास ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. गाजराच्या वापराने डोळ्याचे आरोग्य राखण्यास मदत होते. तसेच गाजराचा ज्यूस केसांना लावणे फायदेशीर ठरते. त्यासाठी गाजराचा रस काढून ३० मिनिटांसाठी फ्रिजरमध्ये ठेवा. नंतर केसाच्या मुळांना लावून काही मिनिटांसाठी तसेच ठेवा. अर्धा तासानंतर केस धुवून टाका.

३. कांदा

कांद्याचा रस केसांचा कोरडेपणा दूर करण्यातही मदत करतो. हे केसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्याशिवाय केसांच्या मुळांना मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि केसांचे आरोग्य सुधारते. तसेच वाढही होते.

४. केळी

केळात असलेले व्हिटॅमिन ए आणि पोटँशियम जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर असते. केसांच्या मजबुतीसाठी केळी स्मॅश करुन घ्या. त्यात मध एकत्र करुन पेस्ट करा. केसांच्या मुळांशी लावून ३० मिनिटांसाठी तसेच ठेवा आणि त्यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.

५. नारळाचं दूध

खोबऱ्याचे तेल केसांसाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहिती. पण नारळाचे दूधही आरोग्या सोबत केसांसाठी फायदेशीर ठरते. नारळाचे दूध केसांसाठी सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. नारळाच्या दुधात मध एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करुन डोक्याच्या त्वचेला मालिश करा. एक तासानंतर माईल्ड शॅम्पूच्या मदतीने केसांना धुवून टाका.

६. दलिया

दलियात आढळणारी पोषक तत्वे आपल्या केसांना फायदेशीर असतात. तसेच हे केसांना पोषक तत्वे पुरवतात. एक मोठा चमचा ताज्या दुधात दलिया एकत्र करुन केसांच्या मुळांना लावा. ३० मिनिटांनी कोमट पाण्याने केस स्वच्छ करा. त्यामुळे केस मजबूत होण्यासंबरोबर त्यांच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते.

( टिप : यातील कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या )