परमबीर सिंह यांच्या बदलीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे उत्तर, म्हणाले…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यानंतर ठाकरे सरकारने तातडीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली. या मोठ्या फेरबदलानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्वांवर राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाझे प्रकरणामुळ मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली होती, त्यामुळे मुंबई पोलिसांची ती विश्वासार्हता जपण्यासाठी सिंह यांची बदली केल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

तसेच मलिक यांनी यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्यं केले आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लसीची मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. तसेच मुंबईत लॉकडाऊनचा अद्याप कोणाताही निर्णय झाला नसल्याचेही नाही. मात्र, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले नाही, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.