‘रामायणा’शी संबंधित ‘त्या’ चुकीसाठी सोनाक्षी सिन्हाला आजही केलं जातं ‘ ! अभिनेत्रीनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

पोलिसनामा ऑनलाइन –केबीसीमध्ये रामायणावरील एका प्रश्नाचं उत्तर द्यायला न जमल्यानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा खूप ट्रोल झाली होती. यावरून ती अजूनही ट्रोल होत असते. तिचं म्हणणं आहे की, एका इमानदार चुकीसाठी अजूनही ट्रोल होत असल्यानं ती परेशान आहे.

त्यातही रामायण पुन्हा प्रसारीत झाल्यानं ती अनेकदा चर्चेत आली आणि तिच्या अडचणीत अजून वाढ झाली. अलीकडेच दिलेल्या एका इंटरअॅक्टीव सेशनमध्ये सोनाक्षीनं आपली चूक मान्य केली आणि वारंवार ट्रोल झाल्यानं आणि सतत निशाण्यावर येण्यानं ती वैतागली आहे असं म्हणत तिनं दु:ख व्यक्त केलं.

सोनाक्षी म्हणाली, “मी रूमा देवी नावाच्या एक स्पर्धकासोबत एक स्पर्धेत भाग घेतला होता. संजीवनी बुटीवरून आम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. एका क्षणासाठी रुमा आणि मी दोघीही ब्लँक झालो. खरं तर हे लाजिरवाणं होतं कारण रामायण पहात आणि वाचत आम्ही मोठं झालो होतो. या गोष्टीला आता 5-6 महिने झाले आहेत. निराशाजनक बाब अशी की, लोक आताही या चुकीवरून ट्रोल करत आहेत.”

रामायणशी संबंधित सोनाक्षीच्या घरी अनेक गोष्टी आहेत. तिच्या वडिलांचं नाव शत्रुघ्न आहे. घरात काकांची आणि भावाचंही नाव रामायणवरून आहे.