…म्हणून सोनाली बेंद्रे परतणार भारतात 

मुंबई : वृत्तसंस्था – कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयार्कला गेलेली सोनाली बेंद्रे लवकरच भारतात परतणार आहे .सोनालीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट करून माहिती दिली. सोनाली काही दिवसासाठी भारतात विश्रांती घेऊन पुन्हा नंतर उपचारासाठी जाणार आहे. सोनाली बेंद्रेला काही महिन्यापूर्वी  कॅन्सर असल्याचं कळलं होत. तेव्हा ती तातडीने उपचारासाठी न्यूयॉर्कला गेली होती. सोनालीला  कॅन्सर झाल्याचे कळताच तिच्या चाहत्यांबरोबर  बॉलीवूडमधल्या कलाकारांना धक्का बसला .
काही महिने तिने कॅन्सरशी यशस्वीपणे झुंज दिल्या नंतर डॉक्टरांनी  तिला विश्रांतीचा सल्ला दिला. आजारपणाच्या काळात तिला तिच्या पतीने चांगली साथ दिली. त्या दरम्यान तीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसाठी एक भावुक पोस्ट शेअर केली .याच काळात अनेक कलाकारांनी तिची न्यूयार्कला जाऊन भेट घेतली होती .
अनेक दिवसा पासून घर,  मुंबई आणि मित्र परिवारापासून दूर असलेल्या सोनाली बेंद्रेने मुंबईत परतण्याचा आनंद पोस्ट करत शेअर केला . कधी कधी आनंद आपल्याला  शब्दांमधून व्यक्त करता येत नाही पण जसजसे आपले घरापासून आंतर वाढते तसतसे आपले घराशी नाते घट्ट होत जाते. न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून फिरताना मी हाच धडा शिकले. तसेच ही  लढाई अजून संपलेली नाही याचीही जाणीव करून दिली. आपल्या माणसांना भेटून मला लढायला अजून ताकद येईल
अशा प्रकारे पोस्ट शेअर केली.