BJP कार्यकर्ता आणि अ‍ॅक्ट्रेस सोनाली फोगटची Bigg Boss 14 मध्ये एंट्री, वादाशी सततचे नाते

नवी दिल्ली : वाद आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे जुने नाते आहे. यावेळी सोनालीचे नाव एका खास कारणामुळे चर्चेत आहे. ती टीव्ही रियल्टी शो बिग बॉसची स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. ती टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखली जाते.

सूत्रांनुसार, टिक टॉक स्टार सोनाली फोगाटला बिग बॉस सीझन-14 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळणार आहे, मात्र यापूर्वी सुद्धा ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. सोनालीच्या जीवनाशी काही किस्से आणि वादांबाबत जाणून घेवूयात…

सोनाली फोगाट फतेहाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. तीला 3 बहिणी आहेत आण 1 भाऊ आहे. आपल्या बहिणीच्या दिराशी सोनालीचा विवाह झाला होता.

सोनालीचे घर हिसारमध्ये आहे. 2016 मध्ये सोनालीचा पती संजयचा फॉर्म हाऊसमध्ये संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. त्यावेळी सोनाली तिथे नव्हती, ती मुंबईत होती. तिला एक मुलगी असून ती हॉस्टेलमध्ये राहते.

पॉलिटिकल करियरबाबत बोलायचे तर ती सुमारे एक दशकापासून भाजपा समर्थक आहे. सध्या ती पक्षाच्या महिला मोर्चाच्या नॅशनल वर्किंग कमिटीची व्हाइस प्रेसिडेंट आहे. सोनालीला अँकरिंगचा सुद्धा अनुभव आहे. तिने हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंगसुद्धा केले आहे.

इतकेच नव्हे, तिने अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. ती रूपेरी पडद्यावर दिसली आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही सीरियल ’अम्मा’ मध्ये नवाब शाहच्या पत्नीचा रोल तिने केला होता.

सोनाली पॉप्युलर टिकटॉक स्टार होती. पण जेव्हा सरकारने टिकटॉक बॅन केले तेव्हा सोनाली सरकारचे पूर्ण समर्थन करताना दिसली होती.

याशिवाय ती फॅमिली मॅटर्समुळे सुद्धा चर्चेत होती. सोनाली फोगाटने मागील वर्षी आपली बहिण आणि मेहुण्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रकरण मारहाणीचे होते.