Sonali Phogat Death Case | सोनाली फोगट मृत्यू प्रकरण ! कुटुंबाचा गंभीर आरोप; पोलिसांनी PA ला घेतलं ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sonali Phogat Death Case | भाजप नेत्या (BJP Leader) आणि प्रसिद्ध टिकटॉक स्टार (Tik Tok Star) सोनाली फोगट यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काल सोनालीच्या बहिणीने हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांच्या भाच्याने त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने (Sonali Phogat Death Case) वेगळं वळण घेतले आहे. तसेच सोनाली ज्या ठिकाणी थांबल्या होत्या त्या ठिकाणाहून त्यांचा लॅपटॉप गायब (Laptop Missing) झाल्याची बाब समोर आली आहे.

 

सोनाली फोगटच्या फार्म हाऊसमधून त्यांचं कॉम्प्युटर आणि लॅपटॉप गायब झाल्याचे आढळून आले आहे. सोनालीचा भाचा अ‍ॅड. विकास (Adv. Vikas) याने सोनालीच्या मृत्यूसाठी त्यांचा पीए सुधीर सांगवान (PA Sudhir Sangwan) याला जबाबदार धरलंय. सोनालीच्या हत्येचा कट सुधीर सांगवानने रचल्याचा आरोप विकासने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सोनालीच्या पीएला गोवा पोलिसांनी (Goa Police) ताब्यात घेतलं आहे. सोनालीसोबत सुधीर गोव्यात होता, अशी माहिती मिळत आहे. सोनालीच्या कुटुंबाने सुधीरवर अनेक प्रश्न (Sonali Phogat Death Case) उपस्थित केले आहेत.

सुधीर सांगवान यांच्या सांगण्यावरुन फार्म हाऊसमधून सोनालीचा लॅपटॉप आणि इतर वस्तू गायब करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये सर्व डेटा आणि जमीन, मालमत्तेची कागदपत्रही सेव्ह होती.
आपलं सुधीर याच्याशी बोलणं झालं होतं आणि त्याच्या मामी सोनाली यांच्या मृत्यूबद्दल वारंवार त्यांची विधानं बदलत आहे,
असा आरोप विकासने केला आहे.

 

दरम्यान, सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची (Unnatural Death) नोंद केली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
प्राथमिक तपासाअंती सोनाली 22 ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या.
हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

 

 

Web Title :- Sonali Phogat Death Case | computer and laptop missing from sonali phogat room family alleges pa sudhir sangwan for murder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा