Sonam Kapoor : सोनम दि वेडींग

बॉलिवूडमधील फॅशनिस्ट सोनम कपूरचा विवाह आनंद आहुजा यांच्याशी आज थाटामाटात पार पडला. या बॉलिवूड विवाहाचे विशेष म्हणजे एका सोशल नेटवर्किंगवर तिच्या लग्नाचे लाईव्ह अपडेट येत आहेत. या विवाहप्रसंगी सोनम लाल रंगाच्या नववधू वेषात शोभून दिसत होती. वधू वेषातील तिचे फोटो व्हायरल होत आहेत. सोनमच्या या विवाह सोहळ्यातील प्रत्येक गोष्टीची चर्चा होत आहे. त्यापैकी एक म्हणजे तिच्या लेहंग्याची किंमत लाखांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. सोनम विवाहासाठी पोहचली तेव्हा उपस्थितांच्या नजारा तिच्यावर खिळल्या.आनंद मात्र सोनमच्या आधीच मंडपामध्ये उपस्थित होता. सोनमच्या चुलत बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर, तसच काका बोनी कपूर वऱ्हाडींचे स्वागत करत होते. या विवाह सोहळ्यासाठी स्वरा भास्कर, करण जोहर, करिष्मा कपूर, करिना कपूर सैफ अली, तैमूर ,राणी मुखर्जी यांच्यासह बऱ्याच सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

ट्रेंडिंग मध्ये सोनमच
सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा गेल्या तीन आठवड्यांपासून बातम्या,छायाचित्र,व्हिडीओ सगळीकडे पाहायला मिळत आहेत. ‘स्कोअर ट्रेंड इंडिया’च्या चार्ट्सवर सोनम सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या स्कोअर ट्रेंड्सच्या यादीत बिग बी अमिताभ बच्चन या आठवड्यात ७०.६८ अंकांनी प्रथम स्थानी आहेत तर दुसऱ्या स्थानावर सलमान खान आणि तिसऱ्या क्रमांकावर संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रणबीर कपूर आहे. अमेरिकेच्या स्कोअर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषावर आधारित ही यादी दिलेली आहे.

 

सोनम दि वेडींग

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like