खिशात पैसा नसतानाही स्वत:चा व्यवसाय करा; सोनू सूद आणतोय ‘ही’ स्कीम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- जेव्हा कोणताही नवा व्यवसाय सुरु करायचा असतो तेव्हा सर्वात जास्त गरज असते ती भांडवलची, पैशांची. जर आपल्याकडे भांडवलच नसेल तर व्यवसाय सुरु करायचा कसा, हा मोठा प्रश्न असतो. पण असा विचार असेल तर तुमच्यासाठी अभिनेता सोनू सूद आणतोय एक स्कीम…

 

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या राज्यात, गावात अडकलेल्या मजूरांना त्यांच्या गावात, शहरात पोहोचविण्याचे मोठे काम त्यावेळी सोनू सूदने केले होते. तेव्हापासूनच त्याचे नाव चर्चेत आहे. मात्र, आता सोनू सूद बेरोजगार तरुणांसाठी नवी स्कीम आणत आहे. या स्कीमनुसार, जर तुमच्या खिशात पैसे नसतील तरीही तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. याबाबतची माहिती स्वत: सोनू सूदने ट्विटरवर दिली.

बेरोजगारांना सशक्त बनवणार सोनू सूद

बेरोजगार तरुणांसाठी नवी स्कीम आणली जात आहे. या स्कीमनुसार, जर तुमच्या खिशात पैसे नसतील तरीही व्यवसाय सुरु करता येऊ शकेल आणि तुम्ही मालक बनून काम करू शकता.

काय म्हणाला सोनू सूद?

‘तयार व्हा, जर तुमच्याकडे शून्य भांडवल असेल तरीही तुम्ही मालक बनू शकता. सोनू या नव्या मोहिमेच्या माध्यमातून गावात असणाऱ्यांना सशक्त बनवू इच्छित आहे.

ट्विरवर युजर्सकडून स्वागत

सोनू सूदच्या या स्कीमची माहिती मिळाल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अनेकजण सोनू सूदच्या या कामाची स्तुती करत आहे आणि अनेकांकडून या स्कीमचे स्वागत केले जात आहे.