सोनू सूदनं मुलासोबत मिळून ‘असं’ केलं अनोख्या अंदाजात वर्कआऊट ! व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोचवल्यानं सोनू सूद सतत चर्चेत होता. इतकंच नाही तर त्यानं डॉक्टर्स आणि स्टाफसाठीही खूप मदत केली आहे. सध्या सोनू वेगळ्याच कारणामुळं चर्चेत येताना दिसत आहे. सोनूचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

सोनूचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो अनोख्या अंदाजात वर्कआऊट करताना दिसत आहे. सोनू त्याचा मुलगा ईशानसोबत पुश अप्स मारताना दिसत आहे. सोनू फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे. ईशाननं सोनूच्या पाठीवर हात ठेवले आहेत आणि पूर्ण वजन त्याच्यावर दिलं आहे. एका मागो माग एक ते दोघंही पुश अप्स मारताना दिसत आहे.

View this post on Instagram

Twinning 💪 @eshaansoood

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

सोनू आणि ईशान दोघांमधील बाँडिंग आणि ट्युनिंग कमालीची आहे. चाहत्यांना या बापलेकांचं वर्कआऊट खूपच आवडलं आहे. सध्या सोनूचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करत वर्कआऊटचं आणि दोघांच्या बाँडिंगचं कौतुक केलं आहे. एक बाप आणि मुलामध्ये असंच बाँडिंग असावं असं चाहत्यांनी म्हटलं आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातेही काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like