Sophiya Bhujel | सोफिया भुजेलच्या मिस युनिव्हर्स-2023 मधील लूकने वेधले सर्वांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मिस युनिव्हर्स 2023 च्या कॉस्ट्यूम राऊंडमध्ये नेपाळची मॉडेल सोफिया भुजेलने (Sophiya Bhujel) परिधान केलेले लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. यावेळी सोफियाने तिच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. तर सोशल मीडियावर तिच्या या लूकचीच चर्चा सुरू आहे. नेपाळची मॉडेल सोफिया भुजेलने (Sophiya Bhujel) कॉस्ट्यूम राऊंडला खास पद्धतीचे लुक करून सर्वांनाच आश्चर्य केले आहे.

कॉस्ट्यूम राऊंडमध्ये सोफियाने हातात त्रिशूल, भर जरी साडी आणि दागिने असा लुक करत यामध्ये तिने भारताची संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तिच्या या लूकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तर अनेकांनी कमेंट करून तिला भरभरून प्रेम देखील दिले आहे.

25 ऑगस्ट 2022 रोजी सोफिया भूजेल हिने मिस युनिव्हर्स नेपाळ 2022 चा ताज पटकावला होता. सोफियाने काठमांडू मधून बिझनेस मॅनेजमेंट मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. सोफियाचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. तिने कोणता फोटो पोस्ट केला तर आजहि तिच्या फोटोवर काही क्षणातच लाखो लाईक्स आणि कमेंट्स यायला सुरुवात होतात.

 

Web Title :- Sophiya Bhujel | bollywood nepal sophiya bhujel look for miss universe 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो