अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ; बीडमधील एक पोलीस कर्मचारी निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचाराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणातील आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सदरील प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न करणे आणि निष्काळजीपणा केल्या याप्रकरणी पोलीस हवालदार सत्यवान गर्जे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
 बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या प्रकरणात तक्रार देऊनही ही पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने पीडिताच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या आदेशावरून पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून आज सकाळी बलात्कारा सह फास्को अपहरण या कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून

निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहर ठाण्यात चे पोहेका सत्यवान गर्जे यांना निलंबित करण्यात आले आहे त्याचबरोबर शहर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची अप्पर पोलीस अधीक्षक मार्फत चौकशी करण्यात येणार असून तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत या प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे पोद्दार यांनी सांगितले आहेत.