SP Leader Ghalib Khan | गांधीजींची मूर्ती पकडून ‘बापू-बापू’ म्हणत रडू लागले ‘सपा’ नेते गालिब, Video पाहून लोक म्हणाले – ‘ऑस्करमध्ये पाठवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SP Leader Ghalib Khan | देशभरात आज गांधी जयंती (Gandhi Jayanti) साजरी केली गेली. यानिमित्त अनेक राजकीय नेते सोशल मीडिया (social media) आणि ठिकठिकाणी महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) श्रद्धांजली अर्पण करत होते. या दरम्यान सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ वायरल होत आहे, जो लोक मोठ्याप्रमाणे शेयर करून कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ समाजवादी पक्षाचे नेते गालिब खान यांचा आहे (Samajwadi Party leader Ghalib Khan emotional Video), जे आज गांधीजींची प्रतिमा पाहून खुप भावनिक झाले होते.

काय आहे व्हिडिओमध्ये

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गालिब खान (SP Leader Ghalib Khan) महात्मा गांधीजींच्या मूर्तीसमोर आपल्या समर्थकांसोबत गेले
आणि बापू-बापू म्हणत गांधीजींची मूर्ती पकडून त्यावर डोके ठेवून रडू लागले. त्यांचे समर्थक सुद्धा यावेळी गडबडल्याचे दिसत आहेत, आणि त्यांना सावरताना दिसत आहेत.
पाहता-पाहता गालिब खान यांचा हा व्हिडिओ वायरल झाला (Ghalib Khan viral video) आणि लोक तो मोठ्या प्रमाणात शेयर करत आहेत.

लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत कमेंट

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ शेयर करत लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
एका यूजरने लिहिले, ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नको, संपूर्ण खेळ बिघडून जाईल.
तर आणखी एक यूजरने लिहिले, बापू आपल्या मुलांना सोडून का गेले… व्हिडिओ ऑस्करसाठी पाठवला पाहिजे.
तर आमिर खान नावाच्या एका यूजरने लिहिले, सपा नेते गालिब खान यांचे ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापले जातील.

 

2019 मध्ये सुद्धा संभलमधून अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला होता.
त्यावेळी गांधी जयंतीला समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष फिरोजखान बापूजींच्या आठवणीने रडताना दिसले होते.
फिरोज खान त्यावेळी सतत म्हणत होते की, बापू कुठे गेलात.
तुम्ही इतक्या मोठ्या देशाला स्वतंत्र केले आणि आम्हाला अनाथ करून निघून गेलात.

 

Web Title : SP Leader Ghalib Khan | sp leader ghalib khan cried while saying bapu bapu people watching the video said send it to oscars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dangerous Apps | सावधान ! तुमच्या फोनमध्ये असतील ‘ही’ Apps तर तात्काळ करा डिलिट, Google Play Store ने बॅन केली 136 धोकादायक अ‍ॅप्स

Pune News | सेवा सप्ताहानिमित्त स्वच्छतादूत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकारने बदलले नॉमिनी संबंधीचे नियम