शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार, क्रिडा शिक्षकाला आजन्म ‘कारावास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन शाळकरी मुलींच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम क्रीडा शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. विजय विठ्ठल मनुगडे (वय-३७ रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आज (बुधवार) ही सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आरोपी विजय मनुगडे याने मे 2017 मध्ये कोल्हापूर येथील राजेंद्र नगर परिसरातील सातवी आणि आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या चार मुलींचे लैंगिक शोषण केले होते. तसेच एका मुलीवर आत्याचार देखील केले होते. या प्रकारामुळे राजेंद्र नगर परिसरात खळबळ उडाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोल्हापूरसह शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती.

याप्रकरणी चार मुलींनी स्वतंत्रपणे राजाराम पोलिसांकडे मनुगडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मनुगडे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याचा न्यायालयाने एकत्रित निकाल देत क्रीडा शिक्षक मनुगडे याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रीडा शिक्षकाला अशा प्रकराची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या खटल्यामध्ये सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता मंजूषा पाटील, सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like