Vaccine : स्पूतनिकची मोठी घोषणा ! लाईट व्हर्जन व्हॅक्सीन करणार सिंगल डोसमध्ये कोरोनाचे काम ‘तमाम’

नवी दिल्ली : रशियाची कोरोना व्हायरस व्हॅक्सीन स्पूतनिकने गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले की, स्पूतनिक व्ही चे लाईट व्हर्जन सिंगल डोसमध्येच कोरोना व्हायरसचे काम तमाम करणार आहे. हा सिंगल डोस 80 टक्केपर्यंत प्रभावी आहे. कंपनीचा दावा आहे की, दोन डोसच्या व्हॅक्सीनच्या तुलनेत त्यांच्या लाईट व्हर्जन व्हॅक्सीनचा सिंगल डोस जास्त परिणामकारक आहे. स्पूतनिकच्या या लाईट व्हर्जन व्हॅक्सीनला रशियन सरकारची मंजूरी सुद्धा मिळाली आहे.

स्पूतनिक व्ही ने म्हटले की, व्हॅक्सीनच्या लाईट व्हर्जनने लसीकरणाला गती मिळेल आणि महामारी पसरण्यापासून रोखता येईल. स्पूतनिकने म्हटले की, व्हॅक्सीनच्या लाईट व्हर्जनचा प्रभाव ओव्हरऑल 79.4 टक्के राहिला आहे. 91.7 टक्के लोकांमध्ये अवघ्या 28 दिवसांच्या आत व्हायरसशी लढणारी अँटीबॉडी तयार झाली. कंपनीने म्हटले की, 100 टक्के लोक ज्यांच्या शरीरात पहिल्यापासून इम्युनिटी होती त्यांनी व्हॅक्सीन घेतल्यानंतर त्यांच्या शरीराची अँटीबॉडी लेव्हल 10 दिवसात 40 पट वाढली.

रशियाची कोरोना व्हायरस व्हॅक्सीन स्पूतनिक व्ही च्या वापरासाठी भारत सरकारने सुद्धा मंजूरी दिली आहे. रशियन व्हॅक्सीनचा पहिला साठा भारतात पोहचला आहे. 1.5 लाख डोस घेऊन रशियन विमान शनिवारी सुमारे 4 वाजता हैद्राबादमध्ये उतरले. यासोबतच देशाला कोरोनाविरूद्ध तिसरे शस्त्र मिळाले आहे. स्पूतनिक व्ही आल्याने लसीकरणाला वेग येऊ शकतो.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, स्पूतनिक व्ही व्हॅक्सीनमुळे महामारी विरूद्धच्या लढाईत भारताला मदत होणार आहे. हा तिसरा पर्याय आपली व्हॅक्सीनची क्षमता वाढवेल आणि लसीकरणात वेग येईल. 1.5 लाख डोसची ही पहिली खेप आहे, पुढे आणखी डोस येतील.