श्रीदेवी ते काजोल… ‘या’ स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   नावात काय आहे ? असा प्रश्न शेक्सपिअरने विचारला असला तरी नावातच सर्व काही आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, बॉलिवूड कलाकार, बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. असे असले तरी त्यांनी स्वत:ची नाव बदलेली आहेत. जाणून घेऊयात या स्टार्सची खरी नाव काय आहेत.

रेखा – सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे पूर्ण नाव आहे भानुरेखा गणेशन. रेखा हे त्यांच्या फर्स्ट नेमचा भाग आहे. एकार्थाने ते त्यांचे मिडल नेम आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी भानु व गणेशन गाळून रेखा हे नवा धारण केलं.

हेलन – डान्सर व अॅक्ट्रेस हेलन यांचे खरे नाव हेलन एन रिचर्डसन आहे. लग्नानंतर त्यांचे नाव हेलन एन रिचर्डसन खान झाले. एवढे मोठे नाव असल्याने त्यांनी केवळ हेलन नाव लिहीण्यास सुरुवात केली आणि त्यांना फिल्म इंडस्ट्री हेलन याच नावाने ओळखू लागली.

असिन – साऊथ इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आलेल्या या अभिनेत्रीचे खरे नाव असिन थोट्टूमकल असे आहे. सरनेम कठीण असल्याने तिने असीन या नावानेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. आज तिला असिन याच नावाने ओळखतात.

काजोल – काजोल आपल्या नावापुढे कधीच आडनाव लावत नाही. काजोलचे खरे नाव काजोल मुखर्जी असून तिचे आई-वडील वेगळे झाल्याने तिने आडनाव कधीच लावले नाही. काजोल ही अभिनेत्री व दिग्दर्शक सोमू मुखर्जी यांची कन्या आहे.

श्रीदेवी –  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पूर्ण नाव आहे श्रीअम्मा यांगर अय्यपन. या नावाचा उच्चार करणे कठीण जात असल्याने त्यांनी श्रीदेवी हे सुटसुटीत आणि सोपे नाव धारण केले.

तब्बू –  अॅक्टिंगच्या दुनियेत अद्यापही अॅक्टिव्ह असलेली अभिनेत्री तब्बू हिचे खरे नाव तब्बसुम हाशमी असे आहे. नाव साधेसोपे व लहान असावे यासाठी तिने तब्बू हे नाव ठेवले आणि ति याच नावाने आजही प्रसिद्ध आहे.

गोविंदा –  गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असे आहे. वडिलांचे नाव आणि अहुजा हे आडनाव हटवण्यामागे तसे काहीही खास कारण नाही.

धर्मेंद्र –  सुपरस्टार धमेंद्र यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना धरमपाजी, धरमजी अशी टोपण नावं आहेत. पण धर्मेंद्र याच नावाने त्यांना ओळखले जाते.

जितेंद्र –  सुपरस्टार जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर असून बॉलिवूडमध्ये त्यांना जितेंद्र याच नावाने ओळखले जाते. जितेंद्र नावाने त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली आणि पुढे हेच नाव लोकप्रिय झाले.